पेठ तालुक्यात वरु णराजाचे आगमन

By Admin | Updated: July 3, 2016 22:28 IST2016-07-03T22:27:58+5:302016-07-03T22:28:25+5:30

पेठ तालुक्यात वरु णराजाचे आगमन

The arrival of Lord Vishnu in Peth taluka | पेठ तालुक्यात वरु णराजाचे आगमन

पेठ तालुक्यात वरु णराजाचे आगमन

 पेठ : संपूर्ण जून महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर जुलैच्या प्रारंभीच वरुणराजाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह जनता सुखावली आहे. पेठ शहर व परिसरात रात्रीपासून संततधार सुरू आहे. गत २४ तासात जवळपास ६५ मिमी पाऊस झाला असून, नद्या-नाले तुडंब भरून वाहत असली तरी तप्त उन्हाने भाजलेल्या जमिनीची भूक भागवण्यासाठी सलग पावसाची गरज आहे. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असून, घरांच्या दुरुस्तीची कामे केली जात आहेत. तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. कालपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही त्यामुळे कमी झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: The arrival of Lord Vishnu in Peth taluka