मालेगावी दगडफेकप्रकरणी धरपकड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 11:34 PM2021-11-15T23:34:58+5:302021-11-15T23:35:19+5:30

मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) दगडफेक, तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी दगडफेक व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अटकसत्र सुरू केले असून शहर पोलीस ठाण्याने ३०, तर आयेशानगर पोलीस ठाण्याने ३ अशा ३३ संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी २२ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Arrest continues in Malegaon stone throwing case | मालेगावी दगडफेकप्रकरणी धरपकड सुरूच

मालेगावी दगडफेकप्रकरणी धरपकड सुरूच

Next
ठळक मुद्देराजकीय नेत्यांचा सहभाग : २२ संशयितांना उद्यापर्यंत कोठडी

मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) दगडफेक, तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी दगडफेक व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अटकसत्र सुरू केले असून शहर पोलीस ठाण्याने ३०, तर आयेशानगर पोलीस ठाण्याने ३ अशा ३३ संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी २२ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रविवारी (दि.१४) रात्री माजी नगरसेवक रहेमान शाह, काँग्रेसचे पदाधिकारी साबीर गोहर यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे. या अटकसत्रामुळे दगडफेक करणाऱ्या संशयित आरोपींचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी रविवारी रात्री आवामी पार्टीचे मो. रिजवान बॅटरीवाला, शेख नासीर शेख महेबूब, माजी नगरसेवक रहेमान शाह, काँग्रेसचे साबीर गोहर, वसीम अख्तर मो. सलीम, अल्ताफ अन्वर शाह, मो. जाहीद अनिस अहमद कच्छी, मो. इम्रान अनिस अहमद, सराईत गुन्हेगार सरफराज, शेख जावीद, शेख इम्रान शेख सलीम, काँग्रेसचे साबीर गोहर यांना अटक करण्यात आली आहे, तर शनिवारी अटक केलेल्या मोहंमद इम्रान मोहंमद उस्मान, आसिफ शेख करीम, मोहंमद रमजान अब्दुल रहीम, मोहंमद हारुण हबीबुररहेमान अन्सारी, फैसल अहमद शकील अहमद, मोहंमद आसीफ मोहंमद युसुफ, तौसीफखान नुरखान, समसुद्दीन अन्सारी, शहेबाज अहमद जलील अहमद, मोईन अनिस, मोइनुद्दीन अब्दुल कादीर, रमजान खान शाहीद खान, आफताब एजाज बेग, शेख अलीम शेख सलीम, आसीफ अहमद निहाल अहमद, अरबाज शेख सरदार, आफताब आलम यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या १७ जणांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्य सूत्रधाराच्या शोधार्थ पथके
पोलीस यंत्रणेने दंगल व दगडफेक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या अटकसत्रामुळे पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव वाढू लागला आहे. अटकेतील संशयित आरोपी हे मुस्लिम संघटना व राजकीय पक्षांशी संबंधित असल्यामुळे पोलीस यंत्रणेची कोंडी झाली आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक होऊ नये म्हणून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून यंत्रणेवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. पोलीस प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Arrest continues in Malegaon stone throwing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.