शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

चौकांपेक्षा मंडळांना द्यावा बंदोबस्त

By admin | Updated: September 4, 2016 00:49 IST

गृहरक्षक दलाकडून अपेक्षा : गणेश मंडळांची मागणी

नाशिकरोड : भरदिवसा गरज नसताना बंदोबस्तावर वायफळ खर्च करण्यापेक्षा रात्रीच्या काळात सार्वजनिक मंडळाच्या मंडपाजवळ बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी मंडळाकडून केली जात आहे.गणेशोत्सव काळात पोलिसांसमवेत गृहरक्षक दलाच्या जवानांची बंदोबस्ताकरिता मदत घेतली जाते. बंदोबस्ताकामी गृहरक्षक दलाच्या जवानांना ३०० ते ४०० प्रतिदिन मानधन दिले जाते. सार्वजनिक मंडळे व हमरस्ते, मुख्य चौकात वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्त लावला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेताना प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक तसेच दहा दिवस दररोज कोण राहणार यांची सर्व माहिती घेतली जाते. गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करण्याची जशी मंडळाची व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. तशी उत्सव शांततेत साजरा व्हावा व कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी याची सर्वाधिक जबाबदारी पोलीस खात्याची आहे. रात्रीचा बंदोबस्त द्यावाशहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पहिले तीन-चार दिवस आरास, देखावे पूर्ण करण्याचेच काम सुरू असते. तर देखावे, आरास बघण्यासाठी अखेरचे तीन-चार दिवसच गर्दी होत असते. सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंतच आरास-देखावे बघण्यासाठी खुले राहतात.त्यानंतर मंडळाकडून मंडप, देखावे बंद करून घेतले जातात. त्यामुळे भर लोकवस्तीत मंडपाजवळ दिवसा बंदोबस्ताची तितकी गरज नसते. टवाळखोरांकडून सायंकाळी देखावे बघण्यास गर्दी झाल्यावर छेडछाड केली जाते. तर भुरटे चोर, मद्यपी यांचा उपद्रव सहसा रात्रीच होतो. पोलीस प्रशासन मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने असलेल्या मूर्ती, मंडपाजवळच २४ तास बंदोबस्त देतात. त्याचप्रमाणे सार्वजनिक मंडळाच्या मंडपाजवळ सायंकाळपासुन संपूर्ण रात्रभर बंदोबस्त देण्याची खरी गरज आहे. रात्रीच्या वेळी ‘खाकी’धारकांच्या उपस्थितीमुळे अनेक उपद्रवांना आळा बसतो. गरज नसतांना भरदिवसा लोकवस्तीत बंद मंडपाजवळ बंदोबस्त लावण्यापेक्षा रात्रीच्या वेळी बंदोबस्त ठेवावा अशी मागणी गणेशोत्सव मंडळ व कार्यकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)