नाशिक : बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून पन्नास हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना वडाळारोडवरील एका सोसायटीत घडली़ शुक्रवारी रात्री साडेनऊ ते साडेदहा वाजेच्या दरम्यान देवप्रभा सोसायटीत राहणारे नासिर आदम खान यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २२ हजार रुपये रोख असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}