वीरजवान अजित शेळके अनंतात विलिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:36 IST2023-03-20T13:34:21+5:302023-03-20T13:36:36+5:30
शेळके हे कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला होता.

वीरजवान अजित शेळके अनंतात विलिन
योगेंद्र वाघ
येवला (जि. नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील वीर जवान अजित गोरख शेळके यांच्यावर सोमवारी सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेळके हे कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला होता. अपघातानंतर गेल्या आठ दिवसापासून त्यांच्यावर राजस्थान येथे उपचार सुरू होते.
मात्र उपचार सुरू असताना शेळके यांची प्राणज्योत मावळली. निधनाची बातमी येवला तालुक्यात समजताच तालुक्यावर शोककळा पसरली. राजस्थान येथून त्यांचे पार्थिव येवला तालुक्यातील मानोरी आल्यानंतर ग्रामस्थांनी वीर जवान अजित शेळके अमर रहे अशा घोषणा दिल्या.
यानंतर फुलांनी सजवलेल्या रथामध्ये शेळके यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानंतर मानोरी अमरधाममध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेळके हे ५४ अरमाड या बटालियनमध्ये आपली सेवा बजावत होते.