शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सेना, भाजपाचे इच्छुक लागले कामाला

By admin | Updated: January 14, 2017 00:51 IST

नाशिकरोड : कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमधील इच्छुक अद्याप शांतच

 नाशिकरोड : मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे सर्व इच्छुक एकत्रितरीत्या घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत, तर भाजपाचे इच्छुक वैयक्तिकरीत्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र कॉँग्रेस - राष्ट्रवादी, मनसे आदि पक्षांच्या इच्छुकांनी अद्यापपर्यंत प्रचारात पाहिजे तसा रस दाखविल्याचे चित्र दिसत नाही.
केंद्रात व राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कोमात गेल्यासारख्या परिस्थितीत आहे. सतत सत्तेत राहणाऱ्या आघाडीचे नेते, कार्यकर्ते सत्ता गेल्यामुळे सुस्तावून गेल्यासारखे झाले आहे, तर गेल्या पंचवार्षिकच्या प्रारंभी अत्यंत फॉर्मात असलेल्या मनसेलादेखील गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणामुळे व अंतर्गत राजकारणामुळे घरघर लागली आहे. तर मोदींच्या करिष्म्यामुळे मवाळ असलेल्या भाजपाला भीमासारखी ताकद आली असून, राजकारणात अत्यंत सुगीचे दिवस आले आहे, तर शिवसेना आपल्या स्वभावाप्रमाणेच मार्गक्रमण करत आहे. आघाडीला आलेली मरगळ व मनसेची होत असलेली राजकीय वाताहात यामुळे शिवसेना-भाजपामध्ये दाखल होणाऱ्यांची गर्दी झाली आहे.
दोन्ही पक्षांकडे इतर पक्षांतून येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्राप्त राजकीय परिस्थिती व गणितानुसार काही जणांना पक्ष प्रवेशासाठी तूर्त थांबण्याचा इशारा व सल्ला दिला जात आहे. त्यामुळे संबंधितांना पुन्हा आहे त्या पक्षातच थांबावे लागत आहे. (प्रतिनिधी)