शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

३० तलवारींसह शस्त्रसाठा जप्त

By admin | Updated: October 2, 2014 00:17 IST

३० तलवारींसह शस्त्रसाठा जप्त

मालेगाव - येवला पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत ३० तलवारी, दोन पिस्तुल व तीन जिवंत काडतुस असा शस्त्रसाठा जप्त करून दोघांना अटक केली.ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शस्त्रसाठा सापडल्याने याप्रकरणी कसुन चौकशी करण्यात येत असल्याचे मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दोन दिवसांपूर्वी याविषयी गुप्त माहिती कडासने यांना मिळाली. त्यांनी याप्रकरणाची आपल्या सुत्रांकडून माहिती घेतली. सदर तलवारींची विक्री करण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर एक बनावट ग्राहक तयार करण्यात आला. सदर ग्राहक आणि तलवारी बाळगणारा मतीन अब्दुुल हमीद (२०) रा. परदेशपुरा, येवला यांच्यात मंगळवारी मध्यरात्री बोलणी झाली. येवला बसस्थानकामागे सौदा करण्याचे पक्के झाले. सदर कारवाईसाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. एक पथक बसस्थानकामागे मध्यरात्री एकवाजेपासून दबा धरुन बसले तर दुसऱ्या पथकाने संशयित आरोपी मतीनच्या घराजवळ पाळत ठेवली. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास संशयित आरोपी मतीन एका पोत्यात २६ तलवारी व एक तलवार स्वत:च्या पाठीला शर्टच्या आत लावून बसस्थानकामागे आला. बनावट ग्राहक आणि संशयित आरोपी मतीन समोरासमोर येताच दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने त्यांच्यावर छापा मारला. त्यावेळी संशयित आरोपी मतीन शर्टात लपविलेली तलवार काढून पोलिस उपनिरीक्षक धीरेंद्र बिलवाल यांच्यावर हल्ला केला. त्यांनी तलवारीचा वार आपल्या हातावर झेलला तर पथकातील पोलिसांनी आरोपी मतीनच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीतून या प्रकरणात दुसरा आरोपी सर्फराज खान महेबुब खान याचाही समावेश असल्याचे उघड झाले. त्यानंतर मतीनच्या घरातून दुसऱ्या पथकाने पिस्तुल व तीन काडतुसे जप्त केले. ही कारवाई पहाटेपर्यंत चालली. दुसरा आरोपी सर्फराज याच्या ताब्यातून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली. मतीनला येवला येथील न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. तर सर्फराज यास गुरुवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. सदर शस्त्रसाठयामागे येवल्यातील लिंबु गॅँग व बोंबिल गॅँग यांच्यातील अंतर्गत वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे.