शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात २९ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी

By admin | Updated: March 2, 2017 01:03 IST

येवला : येथील नगर परिषदेच्या सन २०१७-१८च्या २८ कोटी ८३ लाख ४७ हजार ७६ रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगर परिषदेच्या विशेष सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.

 येवला : येथील नगर परिषदेच्या सन २०१७-१८च्या २८ कोटी ८३ लाख ४७ हजार ७६ रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगर परिषदेच्या विशेष सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. २१ लाख ९९ हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक असून, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून व नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या अर्थसंकल्पात सर्वसमावेशक अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. एलईडी पथदीप साहित्य व पथदीप खांब खरेदीसाठी ४० लाख, गटार बांधकाम व दुरुस्तीसाठी २० लाख, जंतुनाशके खरेदीसाठी २० लाख, पाणीपुरवठा देखभाल व दुरु स्ती ३५ लाख, नवीन क्लोरीनेटर खरेदीसाठी ५ लाख, जलशुद्धीकरणासाठी १५ लाख रु पये यांच्यासह महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर होते. सभेच्या कामकाजाला सुरु वात करण्यापूर्वी दिवंगत पंचमसिंग परदेशी, हरिभाऊ क्षीरसागर, दत्तात्रय मोरे यांच्यासह दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी विशेष सभेमध्ये अंदाजपत्रकाबाबत माहिती दिली. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे निरसन केले. लेखापाल सुभाष निकम, राजेश दाणेज, बंडू खानापुरे यांनी अंदाजपत्रक तयार केले असून, त्याचे सभागृहात वाचन करण्यात आले. यावेळी सभेला एकूण २४ सदस्यांसह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)