शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीकडून अंदाजपत्रकास मंजुरी

By admin | Updated: March 2, 2017 01:12 IST

प्रशासनाने सादर केलेल्या ३७८.९९ कोटीच्या अंदाजपत्रकात ६ कोटींची वाढ करीत स्थायीने ३८४.९९ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली.

मालेगाव : शहर स्वच्छतेवर भर, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सार्वजनिक शौचालये, उत्पन्न वाढीसाठी मालमत्तेचे सर्वेक्षण, हजेरी केंद्रांच्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद व कुठलीही कर वाढ न करता, जमा-खर्चात ३५ लाखांची, मोबाइल टॉवर वसुली एक कोटी अशी किरकोळ दुरुस्ती सुचवत प्रशासनाने सादर केलेल्या ३७८.९९ कोटीच्या अंदाजपत्रकात ६ कोटींची वाढ करीत स्थायीने ३८४.९९ कोटींच्या अंदाजपत्रकास दीड दिवसाच्या चर्चेनंतर मंजुरी दिली. मंजूर अंदाजपत्रक महासभेपुढे सादर करण्यात येणार आहे.गेल्या सोमवारी मनपा प्रशासनाने गेल्या वर्षीचे ४५२.७४ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अंदाजपत्रकात कपात करण्यात आली आहे. प्रशासनाने फुगीर अंदाजपत्रक न सादर करता केवळ ३७८.९९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे. सन २०१७-१८ मध्ये महसुली उत्पन्न १७२.८१ कोटी धरण्यात आले आहे, तर प्रमुख बाबींवरचा खर्च १४०.९४ कोटी एवढा गृहीत धरुन अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले.स्थायी समिती सभापती एजाज बेग व सदस्यांनी मंगळवार व बुधवार असे दीड दिवस चर्चा करून जमा-खर्चात ५० लाखांची, मोबाइल टॉवर वसुली एक कोटी, कत्तल खाना टेंडर एक कोटी ४० लाख, शौचालय उभारणीसाठी अधिकचा निधी अशी सुमारे ६ कोटींची वाढ सुचविली आहे. ३७८.९९ कोटींचे अंदाजपत्रक आता ३८४.९९ कोटींचे झाले आहे. मंजूर अंदाजपत्रक महासभेपुढे सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)