नाशिक परिमंडळातील ४३ हजार शेतकर्‍यांची वीजबिले माफ

By Admin | Updated: May 23, 2014 00:48 IST2014-05-23T00:41:14+5:302014-05-23T00:48:09+5:30

नाशिक : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची वीजबिले माफ करण्याची मागणी शासनाने मान्य केली असून, नाशिक परिमंडळातील सुमारे ४३ हजार शेतकर्‍यांची ७३६ लाखांची वीजबिले माफ केली आहेत.

Approval of 43,000 farmers electricity bill in Nashik region | नाशिक परिमंडळातील ४३ हजार शेतकर्‍यांची वीजबिले माफ

नाशिक परिमंडळातील ४३ हजार शेतकर्‍यांची वीजबिले माफ

नाशिक : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची वीजबिले माफ करण्याची मागणी शासनाने मान्य केली असून, नाशिक परिमंडळातील सुमारे ४३ हजार शेतकर्‍यांची ७३६ लाखांची वीजबिले माफ केली आहेत.
राज्य शासनाने राज्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना जानेवारी ते जून २०१४ च्या वीजबिलात सवलत जाहीर केली होती. त्याप्रमाणे नाशिक परिमंडळातील सुमारे ४३ हजार ६३५ शेतकर्‍यांना या वीजबिल माफीचा लाभ झाला असून, जानेवारी ते मार्च या काळातील सुमारे ७३६ लाखांची वीजबिले शासनाने माफ केली आहेत.
नाशिक जिल्‘ातील सुमारे २९ हजार ६८८ शेतकर्‍यांची जवळपास ५१२.१२ लाख रुपयांची वीजबिले शासनाने माफ केली आहेत. नगर जिल्‘ातील १३ हजार ९४७ शेतकर्‍यांना माफी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या गारपीटग्रस्तांच्या यादीत नाव असलेल्या शेतकर्‍यांना महावितरणने वीजबिलात माफी दिली असून, उर्वरित कृषिपंपधारकांना नियमित वीजबिले वितरित करण्यात आली आहेत.

Web Title: Approval of 43,000 farmers electricity bill in Nashik region