वारकरी महामंडळ देवळा तालुका अध्यक्षपदी अविनाश महाराज महाजन यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:33 IST2020-08-01T17:31:38+5:302020-08-01T17:33:17+5:30
लोहोणेर : वारकरी महामंडळाच्या देवळा तालुका अध्यक्षपदी लोहोणेर येथील किर्तनकार अविनाश महाराज महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

अविनाश महाजन
लोहोणेर : वारकरी महामंडळाच्या देवळा तालुका अध्यक्षपदी लोहोणेर येथील किर्तनकार अविनाश महाराज महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अविनाश महाजन किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत आहेत. त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज हिसवळकर यांनी त्यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
यावेळी वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज हिसवळकर, माजी जिल्हाध्यक्ष श्रावण महाराज अहिरे, गाथा मंदिराचे विश्वस्त सुभाष बच्छाव, किर्तनकेसरी संजय धोंडगे, पुंडलिक महाराज खडकतळेकर, सुदाम महाराज, धनंजय महाजन, काकासाहेब शिंदे, विलास जोशी, रमेश अहिरे, गोरख निकम, दिनेश सोनार, विनोद देवरे आदी उपस्थित होते.