कळवण : ‘मागेल त्याला वीज’ या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मित्रमंडळांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन गणेशोत्सव कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. जागेवर वीजमागणी अर्ज अन् कोटेशन भरून तत्काळ वीजजोडणी व मीटर देण्याच्या उपक्रमाचे कळवण शहर व तालुक्यातील विविध गणेश मंडळांनी स्वागत केले असून, या उपक्र मात सहभाग नोंदविला आहे.२ सप्टेंबरपासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कळवण उपविभागाचे कार्यकारी अभियंता गोपुळवाड व उपकार्यकारी अभियंता एच. आर. खैरनार यांनी गणेश मंडळांना श्री स्थापनेपूर्वी वीजजोडणी व मीटर बसवून सुरळीत आणि अखंड वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतल्याने या पार्श्वभूमीवर कळवण विभागाचे अभियंता चव्हाण, श्रीमती भिरुड, कर्मचारी किसन पगार, बागुल, खांदवे, साळवे, धनगर यांनी शुक्र वारी सर्व गणेश मंडळांना भेटी देऊन या नावीन्यपूर्ण उपक्र माची माहिती देऊन वीजजोडणी करून घेण्याचे आवाहन केले. वीज वितरण कंपनीच्या या उपक्र माचे गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी स्वागत करून गणेश मंडळांनी तत्काळ अर्ज व कोटेशन भरून दिल्याने शुक्र वारी व शनिवारी दिवसभरात २० वीजजोडण्या व मीटर बसवून देण्यात कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. या उपक्र माला गणेश मंडळांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यातून वीज अपघात टाळता येणे शक्य होणार आहे. वीजचोरीवरही आळा बसणार आहे. राष्ट्रीय संपत्तीचेही नुकसान होणार नसल्याने ‘मागेल त्याला वीज’ ही योजना कळवण शहर व तालुक्यातील नवीन ग्राहकांसाठी राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एच. आर. खैरनार यांनी दिली. (वार्ताहर)
जागेवर अर्ज अन् तत्काळ जोडणी
By admin | Updated: September 3, 2016 23:32 IST
कळवणला स्वागत : गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळांसाठी वीज वितरणचा उपक्र म
जागेवर अर्ज अन् तत्काळ जोडणी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}