ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांवर कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 09:06 PM2021-11-03T21:06:20+5:302021-11-03T21:07:14+5:30

वावी : सुमारे ४५ गावांचे कार्यक्षेत्रात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्षभर मदत करणाऱ्या ग्रामरक्षक दलाच्या जवानांसह पोलीस पाटलांचा वावी पोलिसांनी प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. वर्षभर केलेल्या कामाची दखल घेऊन वावी पोलिसांनी त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकल्याने ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांसह पोलीस पाटलांमध्ये दिवाळीत ऊर्जा निर्माण झाली. आगामी काळातही अपुऱ्या पोलीस दलाला मदत करण्याची ग्वाही या ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी यावेळी दिली.

Applause to the members of the village guards | ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांवर कौतुकाची थाप

ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांवर कौतुकाची थाप

Next
ठळक मुद्देदिवाळीत वाढली ऊर्जा : सन्मापत्र देऊन केला गौरव

वावी : सुमारे ४५ गावांचे कार्यक्षेत्रात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्षभर मदत करणाऱ्या ग्रामरक्षक दलाच्या जवानांसह पोलीस पाटलांचा वावी पोलिसांनी प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. वर्षभर केलेल्या कामाची दखल घेऊन वावी पोलिसांनी त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकल्याने ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांसह पोलीस पाटलांमध्ये दिवाळीत ऊर्जा निर्माण झाली. आगामी काळातही अपुऱ्या पोलीस दलाला मदत करण्याची ग्वाही या ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी यावेळी दिली.
पोलिसांनी मदतीला ग्रामरक्षक दलाचे सदस्य मदत करीत असतात. अशा ग्रामरक्षक दलाचे सदस्य व गावपातळीवरील महत्त्वाचे दुवा असणारे पोलीस पाटील यांचा दिवाळीत सन्मान करण्याची कल्पना वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी मांडली.

पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांचा सत्कार करण्याचा निर्णय सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी घेतला. दिवाळी सणाच्या निमित्ताने वावी पोलीस ठाणेच्या हद्दीतील ग्रामरक्षक दल व पोलीस पाटलांचा छोटेखाणी मेळावा घेऊन त्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
दिवाळी सणाच्या निमित्ताने वावी पोलीस ठाणेतील प्रत्येक गावांतील ग्रामरक्षक दलातील सदस्य यांना गाव परिसरातील व समाजाकरिता करत असलेल्या उत्कृष्ट कार्याकरिता प्रशस्तीपत्र व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामरक्षक दलातील सदस्यांकडून वेळोवेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पुष्कळ चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात वावी पोलिसांना यशही मिळालेले आहे. यामुळे ग्रामरक्षक दलासह पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला.
 
Web Title: Applause to the members of the village guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.