शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अ‍ॅँग्री यंग मॅनच्या प्रवासाची दिसली झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:35 IST

नाशिक : अ‍ॅँग्री यंग मॅन म्हणून बॉलिवूडमध्ये दाखल झाला अन् बघता बघता सारे विश्वच आपलेसे केले. नायकाच्या परंपरेला साजेशी शरीरयष्टी नसतानाही तब्बल ४० वर्ष इंडस्ट्रीत आपला रूतबा कायम ठेवणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रवास म्हणावा तितका नक्कीच सोपा नव्हता. त्यांच्या या प्रवासाची झलक ‘७५ फ्रेम्स’ या प्रदर्शनात बघावयास मिळाली. अमिताभ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्दे७५ फ्रेम्स प्रदर्शन महानायक अमिताभच्या यशस्वी कारकिर्दीला उजाळा

नाशिक : अ‍ॅँग्री यंग मॅन म्हणून बॉलिवूडमध्ये दाखल झाला अन् बघता बघता सारे विश्वच आपलेसे केले. नायकाच्या परंपरेला साजेशी शरीरयष्टी नसतानाही तब्बल ४० वर्ष इंडस्ट्रीत आपला रूतबा कायम ठेवणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रवास म्हणावा तितका नक्कीच सोपा नव्हता. त्यांच्या या प्रवासाची झलक ‘७५ फ्रेम्स’ या प्रदर्शनात बघावयास मिळाली. अमिताभ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या प्रदर्शनात बिग बींच्या सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाची झलक बघावयास मिळते. प्रदर्शनात १९७२ ते ८२ च्या दशकातील अमिताभ बघितल्यानंतर त्या काळातील ‘अदालत, खून-पसीना, डॉन, कस्मे वादे, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, काला पत्थर, कालिया आणि लावारिस’ या चित्रपटांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. १९८४ साली जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा इंदिराजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मित्र राजीव गांधी यांच्या दु:खात अमिताभ हेदेखील शोकमग्न झाल्याचे प्रदर्शनात बघावयास मिळते.पत्नी जया बच्चन आणि मुले अभिषेक आणि श्वेता नंदासोबतची त्यांची केमिस्ट्री दर्शविणारी छायाचित्रेही या प्रदर्शनात मांडण्यात आलीआहेत. त्यांचा ‘सरकार’ असो वा अलीकडच्या काळातील ‘लूक’ अशा सर्वच छटा या प्रदर्शनात दिसूनयेतात. एकूणच प्रदर्शनात मांडण्यात आलेले त्यांची छायाचित्रे बघूनउपस्थित अमिताभ यांच्या थक्क करणाºया प्रवासामध्ये रमल्याचे दिसून आले.दरम्यान, या प्रदर्शनात अमिताभ यांची छायाचित्रे, पेटिंग्स, स्केचेस, आर्ट वर्क्स, पोस्टर्स आदी मांडण्यात आले आहेत. प्रदीप चंद्रा आणि एसएमएम औजा यांची ती निर्मिती आहे. प्रदर्शनाला पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, रतन लथ, शर्वरी लथ, अतुल चांडक, शैलेश कुटे यांच्यासह शहरातील विविध मान्यवरांनी भेट दिली.कॉँग्रेसचे उमेदवार अमिताभ...अलाहाबाद मतदारसंघातून कॉँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविणाºया अमिताभ यांचे त्यावेळेचे प्रचाराचे एक पोस्टरही प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. ‘राजीव गांधी यांचे हात मजबूत करा, अमिताभ बच्चन यांना प्रचंड मतांनी निवडून द्या’ असा आशय असलेले हे पोस्टर्स प्रदर्शनात कुतुहलाचा विषय होता.