शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् गावकऱ्यांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:51 IST

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तळवाडे दिगर : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गावात एकाच वेळी चार अंत्ययात्रा निघाल्यामुळे संपूर्ण गावासह उपस्थितांचे डोळे पाणावले. सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान चारही मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.  किकवारी खुर्द येथील कैलास महादू जगताप यांच्या मुलीच्या विवाहासाठी नाशिक येथे जात असताना शिरवाडे वणी जवळ क्रुझरचे वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात किकवारी खुर्द येथील आदर्श गावाचे प्रणेते केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते (६०), सरस्वतीबाई नथू जगताप (५५), कृष्णाबाई बाळासाहेब शिंदे (६२), तेजेश्री साहेबराव शिंदे (१८), तर मुजवाड येथील शोभा संतोष पगारे (३८), उर्वशी विनायक मोरे (१२), डांगसौंदाणे येथील रत्ना राजेंद्र गांगुर्डे (४०) आणि कळवण येथील चालक अशोक पोपट गांगुर्डे (५७) यांचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच किकवारी गावावर शोककळा पसरली. एकूण आठ जणांच्या मृत्यूमुळे बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासाठी आजचा शनिवार काळा शनिवार ठरला. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी जवळ सकाळी ११ वाजेदरम्यान क्रुझरचे टायर फुटल्याने अपघात होऊन बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द, मुंजवाड, डांगसौंदाणे व कळवण येथील आठ जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.हलाखीच्या परिस्थितीत उभा केला संसारडांगसौदाणे : शिरवाडे वणी जवळील अपघातात येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील महिला रत्नाबाई राजेंद्र गांगुर्डे यांच्या मृत्यूची बातमी गावात येऊन धडकताच गावात सर्वत्र शोककळा पसरली. गावातील व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद करून राजेंद्र गांगुर्डे यांच्या घराकडे धाव घेतली. पती राजेंद्र गांगुर्डे यांच्या खांद्याला खांदा लावून रत्नाबाई गांगुर्डे यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कष्टाने संसाराचा गाडा ओढून आपल्या दोन मुलींचे थाटामाटात लग्न लावून दिले. हलाखीच्या परिस्थितीमध्येही आपल्या दोघां मुलांचे उच्चशिक्षण त्या पूर्ण करीत होत्या. हलाखीच्या परिस्थितीत अतोनात कष्ट घेऊन आपल्या संसाराचा गाडा ओढून संसाराचे नंदनवन फुलविणाºया रत्नाबाई गांगुर्डे यांच्या घरी ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून पती व मुलांना धीर दिला. रत्नाबाई गांगुर्डे यांच्यावर येथील आरम नदीतीरी सांयकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पती, दोन मुली, दोन मुले, सासू, सासरे असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघात