शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

...अन् नववधू झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:52 AM

नांदगाव : हुंडा घेऊन चांगले लग्न लावून देण्याची बोली करण्याचे दिवस इतिहासजमा होत चालले आहेत. याउलट वयाने वाढत असलेल्या मुलासाठी हवी तेवढी रक्कम देतो; पण नवरी मिळवून दे अशी याचना करण्याची वेळ कुटुंबप्रमुखांवर आली आहे. या परीस्थितीचा गैरफायदा घेणारे महाभागही समाजात उत्पन्न झाले आहेत. आगतिक नवरा, कुणा अनोळखी मुलीबरोबर लग्न करण्यासाठी मजबूर होतो आणि ‘ती लाडाची नवराई’ काही दिवसातच पूर्व नियोजित कटानुसार पळून जाते. याचे प्रत्यंतर देणारी घटना नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे घडली. अशा प्रकारे काम करणारी ही एक टोळी असावी असा पोलिसांचा कयास आहे.

ठळक मुद्देअशा प्रकारे काम करणारी ही एक टोळी असावी असा पोलिसांचा कयास

नांदगाव : हुंडा घेऊन चांगले लग्न लावून देण्याची बोली करण्याचे दिवस इतिहासजमा होत चालले आहेत. याउलट वयाने वाढत असलेल्या मुलासाठी हवी तेवढी रक्कम देतो; पण नवरी मिळवून दे अशी याचना करण्याची वेळ कुटुंबप्रमुखांवर आली आहे. या परीस्थितीचा गैरफायदा घेणारे महाभागही समाजात उत्पन्न झाले आहेत. आगतिक नवरा, कुणा अनोळखी मुलीबरोबर लग्न करण्यासाठी मजबूर होतो आणि ‘ती लाडाची नवराई’ काही दिवसातच पूर्व नियोजित कटानुसार पळून जाते. याचे प्रत्यंतर देणारी घटना नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे घडली. अशा प्रकारे काम करणारी ही एक टोळी असावी असा पोलिसांचा कयास आहे.पोखरीचे शेतकरी बाबुराव देवरे त्यांचा मुलगा भगवान याचे साठी पाच वर्षांपासून वधूच्या शोधात होते. पण मुलगी मिळत नव्हती. याच गावातला सोमनाथ भुरक (४५) याने जालना, परभणीकडची मुलगी सुचवीली. मनमाड रेल्वे स्टेशनला दि. ८ एप्रिल २०१८ रोजी मुलगी बघण्याचा कार्यक्र म झाला. अश्विनी या मुलीबरोबर अनिल, मुलीची मावशी व छाया नामे बहीण आले होते. मुलगी पसंत नाही पडली तर मनमाड येथूनच दोन्ही पार्ट्या परत जातील असे ठरले होते.पसंती झाली तर मोठी घसघशीत रक्कम मध्यस्थांना द्यावयाचा सौदा झाला होता. पसंती झाली. लगेच विवाह सोहळा आटोपून टाकू म्हणून संध्याकाळी वºहा पोखरीला पोहोचले. दुसऱ्या दिवशी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. अश्विनीच्या अंगावर सोनेचांदीचे ६००० रु. किमतीचे दागिने बाबुराव यांनी घातले. त्यानंतर अनिलकाका व मावशीबाई यांना ठरल्याप्रमाणे १,२०,००० रु देण्यात आले. मध्यस्थी सोमनाथ भूरक, बळीराम चव्हाण, बाबुराव देवरे, भाऊसाहेब गागरे यांच्या साक्षीने रक्कम देण्यात आली.दोन दिवसांनी मुलीचा मेव्हणा संजय मोरे नव्या कोºया दुचाकीवरून तिला घेऊन जाण्यासाठी आला. त्याचे यथोचित आदरातिथ्य करून मुलीला त्याच्या बरोबर माहेरी पाठविण्यात आले. जातांना दोन दिवसांनी तिला घेऊनजा असे सांगुन दोघे गेले. औरंगाबादचा पत्ता दिला. आंबेडकर नगर, गल्ली न.४, मुकुंदवाडी. इथपर्यंत सर्व काही सुरळीत होते. ठरल्याप्रमाणे अश्विनीला आणण्यासाठी मुलाचे वडील गेले. पण पत्ता चुकीचा निघाला. गल्ली न. ४ त्या भागात नाहीच. दिलेल्या मोबाईल नंबरवर वारंवार फोन करूनही केवळ आश्वासनेच मिळाली. उलट अनिल काकाने बदल्यात दुसरीच मुलगी आणून देतो असे सांगितले. अश्विनी आता तर फोन घेतच नाही. चुकून लागला तर ती मी इंदोरला असल्याचे सांगते. गावातील भगीरथ जेजुरकर व मनमाडचे स्नेही अमोल कुलकर्णी, शैलेस पठाडे यांनी गोड बोलून दुसरा मुलगा आहे अशी बतावणी केली आणि मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर आलेल्या सुनीता पाटोळे व तिच्या बरोबर असलेल्या महिलेस पकडून आधी मनमाड पोलीस स्टेशनमध्ये व त्यानंतर नांदगाव पोलिस स्टेशनला आणण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाNashikनाशिक