अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 01:22 IST2022-04-11T01:22:13+5:302022-04-11T01:22:28+5:30
उपेंद्रनगर भागात राहणाऱ्या ऋषिकेश पंकज बिरार (२२ ) या युवकाने रविवारी (दि. १०) त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
सिडको : येथील उपेंद्रनगर भागात राहणाऱ्या ऋषिकेश पंकज बिरार (२२ ) या युवकाने रविवारी (दि. १०) त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे
ऋषिकेश हा शहरातील एका इंजिनीअरिंग महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.