नाशिक : सिडकोतील स्टेट बँक चौकात एका खासगी कंपनीच्या कार्यालयासमोरील रुग्णवाहिकांचा तब्बल २४ रुग्णवाहिकांनी रस्ता अडविण्याचा प्रकार घडला असून, कंपनीने नाशिक शहरात रुग्णवाहिकेचा व्यवसाय करू नये, यासाठी धमकावल्याचा हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश सखाराम मोरे (५६, रा.मुंबई) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांनी नाशिक शहरात रुग्णवाहिकेचा व्यवसाय करू नये, यासाठी संशयित पाशा इस्माईल शेख, शिवाजी पांडुरंग गायधनी, संजय रमेश लहामगे, डॉ.दीपक त्रिपाठी, शिवाजी सटवा वाघमारे व रवींद्र राजाराम काळे यांनी मोरे यांच्या कंपनीच्या कार्यालयासमोरील ४ रुग्णवाहिकांचा रस्ता, तब्बल २४ रुग्णवाहिका रस्त्यावर उभ्या करून रस्ता अडविला, तसेच त्यांच्या रुग्णवाहिकांवर कोणीही काम करू नये, यासाठी रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद मोरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीतांवर गुन्हा दाखल केला आहे.