अंबडला तरुणाचे अपहरण करून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:38 IST2018-10-16T17:38:19+5:302018-10-16T17:38:55+5:30
नाशिक : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तिघा संशयितांनी तरुणाचे अपहरण करीत मारहाण करून लुटल्याची घटना अंबड परिसरातील मारुती प्लाझा येथे घडली आहे़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित जयपाल गिरासे, दत्ता कुटे व योगेश पगार (सर्व रा. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

अजय नामदेव ठाकूर (४०, वृंदावननगर, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गिरासेसोबत त्यांचा ५५ हजार रुपयांचा व्यवहार झाला होता़े या व्यवहाराच्या कारणावरून संशयित गिरासे, कुटे व पगार यांनी १४ व १५ आॅक्टोबर मारुती प्लाझा येथे शस्त्राचा धाक दाखवून बळजबरीने ठाकूर यांच्या गाडीवर (एमएच १५, डीडी १४३२) बसवून खुटवडनगर येथील पेट्रोलपंप, सप्तरंग हॉटेलजवळ, गंगापूर रोड, राज वाइन्स, महाले पेट्रोलपंपाजवळ, एकता व्हॅली, सहावा माळा, एक्स्प्रेस इन हॉटेलच्या अलीकडे व पुन्हा एकता व्हॅली सोसायटीच्या मोकळ्या जागेत नेऊन शिवीगाळ करीत जबर मारहाण केली.
यानंतर संशयितांनी ठाकूर यांच्यावर धारदार हत्याराने वार करून मोबाइल, घड्याळ, १४ हजार रुपयांची रोकड, दहा हजार रुपयांची सीबीझेड एक्स्ट्रीम दुचाकी पळवून नेली़