आदिवासी दुर्गम भागातील मुलांना क्र ीडा साहित्याचे वाटप

By Admin | Updated: September 8, 2016 00:32 IST2016-09-08T00:32:34+5:302016-09-08T00:32:55+5:30

आदिवासी दुर्गम भागातील मुलांना क्र ीडा साहित्याचे वाटप

Allotment of material to tribal children in inaccessible areas | आदिवासी दुर्गम भागातील मुलांना क्र ीडा साहित्याचे वाटप

आदिवासी दुर्गम भागातील मुलांना क्र ीडा साहित्याचे वाटप

 बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील मेंगाळवाडी, गिऱ्हेवाडी या आदिवासी दुर्गम वाडीतील जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब मुलांना जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्य, क्र ीडा साहित्य देण्यात आले. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे ब्रीद वाक्य घेऊन गरजू आर्थिक दुर्बल मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रतिष्ठाने विडा उचलला आहे. सामाजिक बांधिलकीची मदत म्हणून भरत तासकर, चंदन पारख, लक्ष्मण तात्या सोनवणे, ज्ञानेश्वर भोर आदि व्यक्ती मदतीचा ओघ देत असतात.
आदिवासी भागात
शालेय साहित्याचे वाटप जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, विभागीय अध्यक्ष गौतम दर्डा,
मयूर परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष वर्मा, महेश मुळीक, प्रतीक झडे, शुभम बेल्हकर, शिक्षण विस्तार अधिकारी मोरे, केंद्रप्रमुख ठाकरे, मुख्याध्यापक शरद धरम, विष्णू डगळे, अमोल
वालझाडे, वसंत शिंदे, साहेबराव मदगे, पत्रकार संदीप कोतकर, एकनाथ शिंदे आदिंसह
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Allotment of material to tribal children in inaccessible areas