मनपाच्या बस सेवेची सर्व कागदपत्रे वेबसाईटवर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 03:58 PM2020-03-12T15:58:17+5:302020-03-12T16:00:31+5:30

नाशिक-  महापालिकेच्या वतीन बस सेवा सुरू करण्यासाठी मागविण्यात आलेल्या बस या बीएस ६ च्या न घेता बीएस ४ या श्रेणीच्या वापरण्यात येणार असल्याने सध्या घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, २०१८ मध्ये ज्यावेळी बस सेवेसाठी निविदा पूर्व बैठका झाल्या त्यावेळी बीएस ६ ही स्टेज नव्हती असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहेत. त्याच बरोबर बस सेवेविषयी संशय कल्लोळ निर्माण झाला असल्याने निविदा आणि अन्य प्रक्रियेविषयीची कागदपत्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आदेश गमे यांनी दिले आहेत.

All documents of the municipal bus service are available on the website | मनपाच्या बस सेवेची सर्व कागदपत्रे वेबसाईटवर उपलब्ध

मनपाच्या बस सेवेची सर्व कागदपत्रे वेबसाईटवर उपलब्ध

Next
ठळक मुद्दे राधाकृष्ण गमे यांचे आदेश निविदांच्या वेळी बीएस ६ श्रेणी नव्हती

नाशिक-  महापालिकेच्या वतीन बस सेवा सुरू करण्यासाठी मागविण्यात आलेल्या बस या बीएस ६ च्या न घेता बीएस ४ या श्रेणीच्या वापरण्यात येणार असल्याने सध्या घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, २०१८ मध्ये ज्यावेळी बस सेवेसाठी निविदा पूर्व बैठका झाल्या त्यावेळी बीएस ६ ही स्टेज नव्हती असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहेत. त्याच बरोबर बस सेवेविषयी संशय कल्लोळ निर्माण झाला असल्याने निविदा आणि अन्य प्रक्रियेविषयीची कागदपत्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आदेश गमे यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या वतीने लवकरच ग्रॉस रूट कॉँन्ट्रॅक्ट पध्दतीने बस सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी संबंधीत ठेकेदारांनाच बस उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. यात सीएनजी आणि डिझेल बसचा समावेश असून त्या बीएस ४ या श्रेणीतील आहेत. गेल्यावर्षी केंद्रशासनाने बीएस ४ या श्रेणीतील उत्पादने बंद करून प्रदुषण न करणारी बीएस ६ या श्रेणीचीच वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला. परंतु महापालिकेत मात्र ही श्रेणीच नाही. यासंदर्भात गेल्यावर्षी महापालिकेने निविदापूर्व बैठक घेतल्यानंतर अशोका लेलॅँड कंपनीच्या प्रतिनिधींनी बीएस ६ श्रेणीच्या बस वेळेत तयार होऊच शकत नसल्याने या श्रेणीच्या बसेस वगळण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने मान्यता दिली असली तरी त्यावर आता आक्षेप घेतला जात आहे.

यासंदर्भात, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्टीकरण देताना बसेस साठी निविदा गेल्यावर्षी मागविण्यात आल्या, त्यावेळी बीएस ६ ही श्रेणीच नव्हती. त्यामुळे निविदेत यासंदर्भातील अटीचा प्रश्न नव्हतात. तथापि, बस सेवेच्या श्रेणीमुळे वाद निर्माण होत असल्याने यासंदर्भातील अटी शर्ती आणि निविदा प्रक्रीयेची सर्व कागदपत्रे महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: All documents of the municipal bus service are available on the website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.