Ajit Pawar Plane Crash : : 'अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान झालं असतं'; छगन भुजबळांची AAIB च्या अहवालावर शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 14:18 IST2026-03-03T14:03:45+5:302026-03-03T14:18:49+5:30
Ajit Pawar Plane Crash : दोन दिवसापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी एएआयबीने अहवाल दिला, यामध्ये विमान झाडावर आदळले होते असा दावा करण्यात आला आहे.

Ajit Pawar Plane Crash : : 'अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान झालं असतं'; छगन भुजबळांची AAIB च्या अहवालावर शंका
Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे अपघात होऊन एक महिना उलटला. राज्यभरातून त्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी सुरू आहे. दोन दिवसापूर्वी एएआयबीने त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात विमान आधी झाडावर आदळल्याचा दावा करण्यात आला आहे, यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी शंका उपस्थित केली आहे.
"अजित पवार यांचे विमान आधी झाडावर आदळलेले नाही, विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान झालेलं दिसलं असतं. विमान झाडावर पडल्याचं कोणी पाहिलेले नाही. विमान हवेत कलले होते आणि कोसळले, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील दिसत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
इराणचा अमेरिकेच्या वर्मी घाव! 'त्या' हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'लवकरच याचे उत्तर देऊ'
"आम्ही तिथे गेलो, तेव्हा तिथे आम्हाला कोणीही झाड विमानावर आदळल्याचे सांगितले नाही. विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते. कोणीही असे म्हणत नाही की, विमान झाडावर आदळले. मला देखील आश्चर्य वाटले की, कुठल्या झाडावर विमान आदळले. तिथे एकही मनुष्य असा भेटला नाही की, तो विमान झाडाला आदळल्याचे सांगत होता, असंही भुजबळ म्हणाले.
जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले की, तो व्हिडीओ अजितदादांच्या विमानातील नाही. मालक त्यात असता तर ठार झाला असता. पण ते चुकीचे आहे. फक्त पायलटच त्या सीटवर बसू शकतो. मालक झोपला असेल तर निष्काळजीपणा आणि मुजोरपणा आहे, असंही भुजबळ म्हणाले.