इराणचा अमेरिकेच्या वर्मी घाव! 'त्या' हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'लवकरच याचे उत्तर देऊ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:16 IST2026-03-03T12:15:07+5:302026-03-03T12:16:41+5:30

मध्य पूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका असा युद्धाचा भडका उडाला आहे. इराणकडून अमेरिकेला लक्ष्य केले जात आहे. अमेरिकेच्या रियाधमधील दूतावासावर इराणने हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प भडकले आहेत.

Iran's wormy wound to America! After 'that' attack, Donald Trump said, 'We will respond to this soon' | इराणचा अमेरिकेच्या वर्मी घाव! 'त्या' हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'लवकरच याचे उत्तर देऊ'

इराणचा अमेरिकेच्या वर्मी घाव! 'त्या' हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'लवकरच याचे उत्तर देऊ'

इराणवरील अमेरिकेचे हल्ले सुरूच असून, इराणकडूनही हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. इराणकडून अमेरिकेच्या हवाई तळांवरच मिसाईल्स, ड्रोन्स डागण्यात येत आहे. इराणने सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भडकले आहेत. 

सोमवारी सौदी अरेबियातील रियाधमध्ये असलेल्या अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाच लक्ष्य करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, प्रत्यक्षदर्शींनी दूतावासाच्या परिसरात आग आणि धुराचे मोठे लोट बघितले.  

सौदी अरेबियातील प्रशासनाने अमेरिकन दूतावासाच्या परिसरात दोन ड्रोन हल्ले करण्यात आल्याचे सांगितले. या हल्ल्यामुळे इमारतीला आग लागली आणि काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प इराणला काय म्हणाले?

या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला लवकरच उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे.

रियाधमधील इराणच्या हल्ल्यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "लवकरच उत्तर दिले जाईल. इराणमध्ये लष्कर तैनात करण्याची गरज पडेल, असे वाटत नाही." 

इराणसोबत सुरू झालेल्या लष्करी संघर्षात अमेरिकेचे आतापर्यंत सहा जवान मारले गेले आहेत आणि १८ जखमी झाले आहेत. 

ट्रम्प यांची ओबामांवरही टीका 
 
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "जर मी ओबामांचा इराण अणू ऊर्जा करार संपवला नसता, तर इराणजवळ इराणकडे तीन वर्षांपूर्वीच आण्विक शस्त्रास्त्रे असती." डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातच अमेरिकेला या करारातून बाजूला केले होते.  

Web Title: Iran's wormy wound to America! After 'that' attack, Donald Trump said, 'We will respond to this soon'