नाशिकहून गोव्यासाठी जानेवारीपासून हवाई सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 09:08 IST2021-12-10T09:07:01+5:302021-12-10T09:08:29+5:30

नाशिकच्या विमानतळावरून सध्या अलाईन्स एअर, स्टार एअर ट्रु जेट या कंपन्यांच्या अहमदाबाद, पुणे, बेळगाव, हैदराबाद शहरांसाठी सेवा सुरू आहेत. ...

Air service from Nashik to Goa from January | नाशिकहून गोव्यासाठी जानेवारीपासून हवाई सेवा

नाशिकहून गोव्यासाठी जानेवारीपासून हवाई सेवा

नाशिकच्याविमानतळावरून सध्या अलाईन्स एअर, स्टार एअर ट्रु जेट या कंपन्यांच्या अहमदाबाद, पुणे, बेळगाव, हैदराबाद शहरांसाठी सेवा सुरू आहेत. मात्र, उडान अंतर्गत अनुदानित स्वरूपातच अनेक मार्गांवर विमान सेवा सुरू करू इच्छिणाऱ्या कंपन्यानी केंद्र शासनाकडून मान्यता घेतली; मात्र मान्यताच सुरू केलेली नाही. यासंदर्भात नाशिकमधील उद्योजक मनीष रावळ यांच्यासह अन्य मान्यवरांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन दिल होते.

पालकमंत्री भुजबळ यांनी यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठवून अन्य प्रलंबित मार्गांवरील सेवा सुरू करण्याची सूचना केली होती. त्याला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रत्युतरादाखल दिलेल्या पत्रात स्पाईस जेटची सेवा येत्या जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे कळविले आहे. याच कंपनीची दिल्ली आणि हैदराबाद सेवादेखील जानेवारी महिन्यापासून मार्गी लागणार आहे.

Web Title: Air service from Nashik to Goa from January