काकडगाव सोसायटी अध्यक्षपदी अहिरे

By Admin | Updated: January 14, 2016 00:04 IST2016-01-13T23:46:58+5:302016-01-14T00:04:57+5:30

निवड : उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील बिनविरोध

Ahir has been elected president of Kakadgaon Society | काकडगाव सोसायटी अध्यक्षपदी अहिरे

काकडगाव सोसायटी अध्यक्षपदी अहिरे

नामपूर : येथील काकडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी रामू अहिरे यांची, तर उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीत सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी रामू अहिरे यांच्या नावाची सूचना रामचंद्र अहिरे यांनी मांडली. त्यास अजित अहिरे यांनी अनुमोदन दिले, तर उपाध्यक्षपदासाठी प्रवीण पाटील यांच्या नावाची सूचना भाऊसाहेब काकडे यांनी मांडली. त्यास
खंडू ह्याळीज यांनी अनुमोदन दिले. अन्य कोणाचाच अर्ज न आल्याने अध्यक्षपदी रामू अहिरे यांची, तर उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी पी. पी. पाटील. सरपंच नंदलाल अहिरे, तंटामुक्तचे अध्यक्ष राजाराम पाटील, विनोद अहिरे यांनी परिश्रम घेतले. बैठकीस संचालक रामचंद्र अहिरे, अजित अहिरे, शिवाजी अहिरे, संजय अहिरे, अभिमन पवार, खंडू ह्याळीज, भाऊसाहेब काकडे, दादाजी सोनवणे, छाया अहिरे, मीना अहिरे, विनोद पाटील, विजय अहिरे, अशोक नरवाडे, बाजीराव अहिरे आदि हजर होते. पंडित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहू, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष रामू अहिरे, उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: Ahir has been elected president of Kakadgaon Society