शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे शेतीची कामे खोळंबली

By admin | Updated: November 16, 2016 23:48 IST

भारनियमनामुळे शेतीची कामे खोळंबली

लोहोणेर : १२ तास वीजपुरवठा बंद असल्याने गैरसोयलोहोणेर : भारनियमनामुळे परिसरातील शेतीची कामे खोळंबली असून, वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. लोहोणेर, ठेंगोडा, सावकी आदि परिसरात वीज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात येणारे सुमारे १२ तासांचे भारनियमन रद्द करून परिसरातील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी लोहोणेर, ठेंगोडा, सावकी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. लोहोणेर, ठेंगोडा, सावकी आदि परिसरात राज्य वीज वितरण कंपनीच्या ठेंगोडा येथील ३३/११ केव्ही सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा करण्यात येतो, तर या विद्युत केंद्रास देवळा व सटाणा येथील उच्च दाबाच्या केंद्रामधून वीजपुरवठा करण्यात येतो. सध्या लोहोणेरसह परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने लोहोणेर परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे नाहक पश्चात्तापाची वेळ आली आहे. लोडशेडिंग बंद करून सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत करावे, अशी मागणी सतीश देशमुख, दीपक बच्छाव, राकेश गुळेचा, राजेन्द्र वाघ, रमेश आहिरे, संजय शेवाळे, अनिल आहिरे, मदन साखरे, कारभारी पगार, मोती चौधरी, सुनील परदेशी, सुरेश पाटील, अरुण शिवले, संजय परदेशी, अशोक अलई आदिंनी केली आहे. (वार्ताहर)