शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शाळा तंत्रज्ञानात अगे्रसर्न

By admin | Updated: March 3, 2017 01:02 IST

पेठ : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येत असताना ग्रामीण भागातील शाळा यामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येत आहेत.

 रामदास शिंदे  पेठ बदलत्या काळाबरोबर आधुनिक विकासाची कास धरत असताना जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येत असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा यामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येत आहेत.एकेकाळी त्याच दगडी व कौलारू खोलीत टोपी, सदरा व धोतरच्या वेशातील मास्तर आणि भिंतीवर चिटकविलेल्या मळकट फळ्यावर खडूच्या साह्याने हातात छडी घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे मास्तर आणि फुटकी पाटी पिशवीत कोंबून वावरातून थेट शाळेच्या वर्गात धापा टाकत येणारी मुले; मात्र दिवसेंदिवस वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी व स्वत:ला सिद्ध करून दाखविण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला असून, शहरी शाळांच्या तुलनेत ग्रामीण व आदिवासी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सरस ठरू पाहत आहेत.डिजिटल शाळा ही संकल्पना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तशी दुर्र्मीळच; मात्र शिक्षकांच्या संकल्पनेतून व मोलमजुरी करून कमविलेल्या पैशातून शाळेला दान करणाऱ्या ग्रामस्थांच्या जिद्दीने आज ग्रामीण भागातील बालके तंत्रज्ञानाचे धडे गिरवू लागली आहेत. शिक्षकांनी पदरमोड करून शाळांचा चेहरा मोहरा बदलला. एरवी शालेय पोषण आहार व बांधकामाच्या जोखडात सापडलेल्या शिक्षकाने हातात रंग आणि ब्रश घेतला. प्रथम शिक्षकांनी शाळांचा बाह्य भाग सुशोभीत केला. जमेल त्या साधनांचा वापर करून शाळा डिजिटल करण्याचा शिक्षकांचा प्रयत्न तसा अभिनंदनीयच.आज ग्रामीण भागातील शेकडो शाळांना ई-लर्निंग सिस्टीम मिळाली. संगणकाच्या साह्याने नाहीच काहीतर स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षकांनी सुरू केलेले स्मार्ट ज्ञानदान प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी वरदान ठरू पाहत आहे. ग्रामीण शाळांमध्ये तरुण शिक्षकांचा भरणा तसा मोठा आहे. शिकणे व शिकविणे या दोन्हीही गोष्टी शिक्षकांच्या नसानसांत भिनल्याने झपाटल्यागत काम करताना शिक्षक दिसून येत आहेत. स्वत:ची वेबसाइट बनविण्यापासून तर संगणकाचे संपूर्ण ज्ञान, शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती ब्लॉगच्या माध्यमातून माहितीचा खजाना शिक्षण विभागासाठी खुला करून देण्यात आला आहे.आजच्या तंत्रज्ञान युगात सर्वच क्षेत्रात गरुडझेप घेतली. यात शिक्षणक्षेत्रानेसुद्धा मोठी मजल गाठली आहे. विद्यार्थी अभ्यासक्रमातील संगणक विषय, दृकश्राव्य साहित्याचा अध्यापनातील वापर ते विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंत शिक्षणक्षेत्रात नवीन वाटचाल सुरू केली आहे. यासाठी राज्यभरातून तंत्रज्ञानस्नेही सर्व शिक्षकवृंदानी नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी जिवाची पराकाष्टा केली.