शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पुनेगावचे पाणी पोहचले दरसवाडी धरणात

By admin | Updated: September 5, 2016 23:12 IST

४० वर्षांची प्रतीक्षा संपली : येवलेकरांच्या पाणी चाचणीच्या आशा धूसर

गोरख घुसळे ल्ल पाटोदावेळ : दुपारी ४ वाजेची.स्थळ : दरसवाडी कालवागेल्या ४० वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व चांदवड व येवला तालुक्याला नवसंजीवनी ठरणाऱ्या पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यास चाचणीसाठी सोडण्यात आलेले पाणी सोमवारी तब्बल अकरा दिवसांनी दुपारी चार वाजता ६१.७०५ किलोमीटर परसूल जवळील नदीपात्रातून दरसवाडी धरणात पोहचल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात असुन शेतकर्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, दरसवाडी धरण ९० टक्के भरले तरच पुढे येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत ४२ किलोमीटर या डोंगरगाव पोहोच कालव्यास चाचणीसाठी पाणी सुटू शकते अशी चर्चा असल्याने येवला तालुक्यातील बाळापुरपर्यंत पाणी चाचणी होते की नाही याबाबत शंका निर्माण झाली असल्याने येवलेकरांच्या चाचणीसाठी पाणी पोहोचण्याच्या आशा धूसर झाली आहे.यावर्षी जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले असल्याने व वाया जाणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची चाचणी घ्यावी अशी मागणी कडवा कालवा विभागाकडे येवला तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी केली होती. मात्र या मागणीला संबधित विभागाने केराची टोपली दाखविल्याने शेलार व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी २३ आॅगस्ट पासून कातरणी येथील कालव्यावरच उपोषण सुरु केले होते. जोपर्यंत ओव्हरफ्लोच्या पाण्याने या कालव्याच्या चाचणीसाठी पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेऊन उपोषण तीव्र केल्याने काही उपोषणार्थीची प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर काहींनी जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपचार करून घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती जास्तच खालावली होती.तिसऱ्या दिवशी कडवा कालवा विभागाचे अभियंता टाटीया यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून चाचणीसाठी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता उपोषणार्थीनी आपले आंदोलन मागे घेतले. आश्वासनाप्रमाणे दि. २६ आॅगस्ट रोजी पुणेगाव धरणातून या कालव्यास चाचणीसाठी सुमारे १०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. मात्र या कालव्याची ही पहिलीच चाचणी असल्यामुळे पाणी गळती मोठया प्रमाणात होत असल्याने व कालवा परिसरात मोठया प्रमाणात पाणी चोरीही होत असल्याने पाण्याचा प्रवाह संथ व कमी वाहत असल्याने पाणी पोहोचण्यास उशीर होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता व चाचणी पूर्ण होते की नाही याबाबत शंका होती. गेल्या अकरा दिवसांपासून विविध अडथळ्यांंची शर्यत पार करीत पाण्याचा प्रवाह आज दरसवाडी धरणाजवळील परसूल गावच्या नदीतून प्रवाहित होऊन दरसवाडी धरणात पोहोचल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असुन अनेक शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.