आरोग्य विद्यापीठाचे ‘पीजी’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:36 IST2020-07-14T17:31:48+5:302020-07-14T17:36:08+5:30
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे एमएससी इन फार्मास्युटिकल मेडिसन, हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन व मास्टर्स आॅफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्र माचे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशप्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्र मांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

आरोग्य विद्यापीठाचे ‘पीजी’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे एमएससी इन फार्मास्युटिकल मेडिसन, हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन व मास्टर्स आॅफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्र माचे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशप्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्र मांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता करियरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नावीण्यपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र, आरोग्य सेवा व्यवस्थापन व औषध निर्मिती क्षेत्रातील नावीण्यपूर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी ही प्रवेशप्रक्रिया असल्याची माहिती कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. विद्यापीठाच्या मास्टर इन पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र मात विद्यार्थ्यांना पोषणविषयक विशिष्ट कार्यक्र माचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि करण्यात आलेल्या उपक्र मांचे मूल्यमापन अशा सर्व व्यवस्थापकीय कौशल्याचे ज्ञान मिळत असल्याने हा अभ्यासक्र म वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्र मांमधून विद्यार्थ्यांना औषध निर्मिती संदर्भातील क्लिनिकल ट्रायल, मेडिकल राईटिंग, फॉर्माको व्हिजिलन्स रेग्युलेटरी अफेयर्स, मेडिको मार्केटिंग, क्लिनिकल रिसर्च आणि क्लिनिकल डाटा व्यवस्थापन आदी कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येते याकरिता सध्याची परिस्थिती व भविष्यात करियरची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवी, पदविका परीक्षा उत्तीर्ण, बी.एस्सी नर्सिंग व अनुषंगिक अभ्यासक्र माचे पदवीधर या अभ्यासक्र माला प्रवेश घेऊ शकतात. तसेच एम.एस्सी फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्र माकरिता आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवीधर विद्यार्थी तसेच बी.एस्सी, बी.फार्मसी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्र मास प्रवेश घेऊ शकतात, असे कुलगुरूंनी सांगितले.
: