शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

प्रशासन जुने नाशिककरांसोबत : गमे, नांगरे पाटलांचा पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 2:07 PM

कोरोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त आणि स्वच्छतेच्या सर्व उपाययोजना आपल्यावर लागू होतात, असे ते म्हणाले. मुस्लीमबहुल परिसर असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषेतूनदेखील रहिवाशांसोबत संवाद साधला.

ठळक मुद्देजुने नाशिककरांनी स्वयंशिस्त अन् जिद्दीने करावी मात

नाशिक : शहराचा गावठाण भाग व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नाशकात मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचा फैलाव झाल्याने बुधवारी (दि.१०) मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पाहणी करत लोकांशी संवाद साधला. मनपा, पोलीस प्रशासन रहिवाशांसोबत असून जुने नाशिककरांनी जिद्द व स्वयंशिस्तीने कोरोनावर मात करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.या भागातील कोरोनाबाधितांची संख्या या आठवडाभरात सुमारे ५०पेक्षा अधिक झाली आहे. तसेच पाच लोकांना कोरोनाने मृत्यूही झाला आहे. यामुळे या भागात नागरिकांना गांभीर्य पटवून देण्यासाठी जुने नाशिक परिसरातील मनपा प्रभाग क्रमांक-१३ मध्ये समाविष्ट असलेला संपुर्ण नाईकवाडीपुरा परिसर महापालिकेकडून सील केला गेला आहे. या भागात कुठल्याही नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच येथील रहिवाशांनाही कोणत्याही कारणासाठी बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. कन्टेंन्मेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या नाईकवाडीपुरा भागात जीवनावश्यक वस्तू अर्थात भाजीपाला, दूध वगैरेंचा पुरवठा करण्याची संपुर्ण तजवीज मनपा प्रशासनाने केली असून प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गमे व नांगरे पाटील यांनी केले आहे. यावेळी नाईकवाडीपुरा भागातील अजमेरी मशिद परिसरात नांगरे पाटील यांनी छोटेखानी चौकसभा घेऊन नागरिकांचे प्रबोधन केले. कोरोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त आणि स्वच्छतेच्या सर्व उपाययोजना आपल्यावर लागू होतात, असे ते म्हणाले. मुस्लीमबहुल परिसर असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषेतूनदेखील रहिवाशांसोबत संवाद साधला. यावेळी उपायुक्त अमोल तांबे, वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, डॉ. आवेश पलोड आदि उपस्थित होते. समाविष्ट होणा-या नाईकवाडीपुरा परिसरात भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे, नगरसेवक वत्सला खैरे, गजानन शेलार हे परिसरात फिरून लोकांना कोरोनापासून बचावासाठी आरोग्यखात्याकडून सुचविलेल्या उपाययोजनांनी अंमलबजावणी करण्याचे आवाहन करत आहेत....आता रंगारवाडा शाळेत दवाखानानाईकवाडीपुºयाजवळच असलेल्या बुधवार पेठेतील रंगारवाडा मनपा शाळेत आरोग्य विभागाकडून प्राथमिक उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे बाह्यरूग्ण तपासणी करून औषधोपचार डॉक्टरांकडून दिला जात आहेत. तसेच नागरिकांची स्क्रिनिंगदेखील केली जात आहे. कोरोना आजाराशी साम्य असलेली तीव्र लक्षणे दिसल्यास संबंधितांना तत्काळ कोरोना उपचार केंद्रात हलविण्याच्या सुचना येथील वैद्यकिय पथकाला देण्यात आल्या आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयदेखील जुने नाशिकमध्येच असून या ठिकाणीही कोरोना कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस