भाविक महिलेचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:31 IST2019-10-13T00:30:07+5:302019-10-13T00:31:04+5:30

इगतपुरीतील घाटनदेवी येथे देवदर्शनासाठी जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या लहवित येथील भाविक महिलेचा मृत्यू झाला.

Accidental woman dies in accident | भाविक महिलेचा अपघातात मृत्यू

भाविक महिलेचा अपघातात मृत्यू

नाशिक : इगतपुरीतील घाटनदेवी येथे देवदर्शनासाठी जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या लहवित येथील भाविक महिलेचा मृत्यू झाला. अनिता उत्तम गायकवाड (२९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.७) गायकवाड या घाटनदेवी मंदिरात देवदर्शनासाठी पायी जात असताना मुंबईकडून भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शुक्रवारी (दि.११) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

Web Title: Accidental woman dies in accident