गायींची वाहतूक करणाऱ्या पिकअप व्हॅनला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:05 IST2018-09-18T18:04:57+5:302018-09-18T18:05:19+5:30
बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव-अजमिर सौंदाणे रस्त्यावरून कत्तलीसाठी गायी घेवून जाणारा पिक-अप व्हॅन अवघड वळणावर पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला. सटाणा पोलिसांनी तीन गायींसह पिकअप वाहन जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

गायींची वाहतूक करणाऱ्या पिकअप व्हॅनला अपघात
मंगळवारी पहाटेच्या सुमारास ब्राम्हणगाव-अजमीर सौंदाणे रस्त्यावर हा अपघात घडला असता स्थानिक नागरिकांनी या अपघाताची माहिती सटाणा पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा, पोलीस कर्मचारी जिभाऊ बागुल, पंकज शेवाळे, हेमंत कदम, दिलीप पवार यांनी घटनास्थळी धाव घेत तीन गायी व पिकअप ताब्यात घेतली आहे. दरम्यान जप्त केलेल्या पिकअपच्या दर्शनी भागावर एम एच ३९ जी ७१७१ असा क्र मांक असलेली नंबर प्लेट आहे तर मागील बाजूस एम एच ३९ जी७१७ या क्र मांकाची नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास आले आहे.