शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याजवळ अपघात; सहा ठार

By admin | Updated: August 4, 2014 19:34 IST

येवल्याजवळ अपघात; सहा ठार

येवला : शहरापासून मनमाडकडे बारा कि.मी. अंतरावर असणाऱ्या तांदूळवाडी फाट्याजवळ व्हॅन व टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार वर्षीय मुलासह सहा युवक ठार झाले. सदरची घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. मारुती व्हॅनमधून (क्र. जीजे १८ एएस २९०१) मध्य प्रदेशातील नऊ भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते. सदरची व्हॅन तांदूळवाडी फाट्याजवळ हॉटेल मेवाडनजीक आली असता याचदरम्यान मनमाडच्या दिशेने निघालेला आयशर टेम्पो (क्र. एमपी ४६ जी ०७५३) यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली. परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊसही सुरू होता. भीषण अपघातामध्ये व्हॅनमधील पाच प्रवासी जागीच ठार झाले, तर अन्य चौघांना येवला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले होते. मात्र, रस्त्यातच चौघांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील मयतांपैकी चार जण मध्य प्रदेशातील डेहार (ता. कोकसे, जि. धार) येथील आहेत. त्यांची नावे अशी: जितेंद्र हनसिंग बगेर (२३), चेतन रमेश सिसोदिया (२१), शैलेंद्र पंकज बगेर (४), अनिल महेंद्र पटेल (२०), रवींद्र रणजितसिंग चव्हाण (३०, रा. गुडगु, ता. अली, जि. राजापूर, मध्य प्रदेश) आणि अनिल महेंद्र पटेल (१९) यांचा समावेश आहे. राहुल नानसी बामनिया (२२, रा. मानवतनगर, इंदूर) याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे, तर अनिल चंद्रसिंग किराडे (२०, रा. डेहार, ता. कोकसे, जि. धार) याच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. पंकज नारायण बगेर (२५) याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी आयशर चालक सचिन भगिरथ कुशवाह, रा. बडवानी यास ताब्यात घेण्यात आले.(पान ८ वर)सकाळी सहा वाजता झालेल्या भीषण धडकेच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. संभाजी पवार यांनी स्वत:चा जेसीबी आणून पांडुरंग शिंदे, विलास काटे व ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना व मृतांना बाहेर काढले. पोलीस निरीक्षक राम भालसिंग, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम, हवालदार शिरूड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक संजय मोहिते, अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस उपअधीक्षक मनमाड विभाग नरेश मेघराजानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तालुका पोलिसांनी जखमींजवळील कागदपत्रांनुसार दूरध्वनीवरून अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांना माहिती दिली. येवला ग्रामीण रुग्णालयात मयतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्तांचे नातेवाइक येवला येथे येणार आहे. (वार्ताहर)