पंचवटी : जुना आडगाव नाक्यावरील पंचवटी बस आगारातील स्टोअर रूमला सकाळी सात वाजता आग लागून रूममधील कागदपत्रे जळाल्याची घटना घडली. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. याबाबत माहिती अशी की, जुना आडगाव नाक्यावर शहर बससेवेचे पंचवटी आगार असून, सकाळी सात वाजता स्टोअररूममधून धूर व आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे काही बसवाहक व चालकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती कळविली. घटनेनंतर पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पंचवटी बस आगारात धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या आगीत प्रवाशांचे जुने पास व अन्य कागदपत्रे काही प्रमाणात जळाले.दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही; मात्र सदर स्टोअररूम अत्यंत अडचणीचे आणि दुर्लक्षित असल्याने आगी बाबत महामंडळाने माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सदर ठिकाणी फारसे उपयुक्त कागदपत्रे नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले असले तरी काही महत्त्वाचे जळाले असल्यास त्याची माहिती घेतली जात आहे. (वार्ताहर)
दुर्घटना : महत्त्वाची कागदपत्रे जळाली; मालमत्तेचेही नुकसान
By admin | Updated: April 26, 2017 01:39 IST