Accident at Ghoti Chowfuli; One killed, two injured | घोटी चौफुलीवर अपघात; एक ठार, दोघे जखमी

घोटी चौफुलीवर अपघात; एक ठार, दोघे जखमी

घोटी :  शहरातील घोटी-  सिन्नर चौफुलीवर मुंबई महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीस ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात यात मोटारसायकलवरील युवक जागीच ठार झाला, तर अन्य दोन युवक गंभीर जखमी झाले.
रविवार दुपारी साडेतीन वाजेच्या हा अपघात झाला मोटारसायकल वरील युवक कृष्णा पंढरीनाथ कौले,( रा श्रीघाट) हा जागीच ठार झाला तर संजय दामू शिंदे (रा उंबरकोन,इगतपुरी) व सुनील पावरा (रा.तळोदा,नंदुरबार) हे दोघे युवक जखमी झाले आहे.
मोटारसायकलवरील युवक हे घोटी सिन्नर महामार्गावरून मुंबई आग्रा महामार्गावर येताच नाशिकहून इगतपुरीच्या दिशेने जाणारा ट्रक (क्रमांक  एम एच १८ / बी ए ०५६०) ने जोराची धडक दिली.यात ट्रकच्या पुढील चाकाखाली मोटारसायकल दबली होती.
अपघाताची माहिती मिळताच घोटीचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक संजय कवडे, हवालदार सुहास गोसावी,बस्ते, आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Accident at Ghoti Chowfuli; One killed, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.