शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

फूल विक्रे ता खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:42 AM

सुरगाणा : नाशिक शहरातील पंचवटी परिसरात फूल विक्रेत्याच्या खून प्रकरणातील वर्षभरापासून फरार संशयित आरोपीस सुरगाणा पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देसुरगाणा पोलिसांनी अटक केलीमारहाण करण्यापुर्वी या सर्वांनी एकत्रित फोटो काढले

सुरगाणा : नाशिक शहरातील पंचवटी परिसरात फूल विक्रेत्याच्या खून प्रकरणातील वर्षभरापासून फरार संशयित आरोपीससुरगाणा पोलिसांनी अटक केली आहे.नाशिक येथील पंचवटीतील फूल विक्रेत्याचा मृतदेह येथून जवळच असलेल्या उंबरपाडा शिवारात रस्त्यालगत मिळूनआला होता. या प्रकरणी पोलिसांनी पंचवटीतील सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मृत व्यक्तीच्या पत्नीनेएका व्यक्तीसह त्याच्या साथीदारांवर संशय व्यक्त केला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत मंगेश शालीग्राम पाटील (४२) याचा मृतदेह येथून जवळच असलेल्या उंबरपाडा गावाजवळ आढळून आला होता. ते पंचवटीतील दिंडोरी रस्त्यालगत मायको दवाखान्याच्या पाठीमागे गल्ली नं.२ मध्ये राहात होते. मंगेश याची पत्नी नंदा पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद देऊन नाशिकमधीलच काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता.यामध्ये पवन खत्री, विकी ठाकुर, जयेश दिवे, धिरज ललवानी, सुनिल उर्फ जॉन काजळे सर्व राहणार पंचवटी यांना अटक झाली होती. ते सर्व तुरु ंगात आहेत. मात्र या गुन्ह्यÞातील दिपक उर्फ राहुल वसंत नंदन हा संशयीत आरोपी गुन्हा घडल्या पासून फरार होता. त्यास सुरगाणा पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी सांगितले.गेल्या वर्षी फेब्रुवारी महीन्यात पंचवटीतील फूल विक्र ेता मंगेश पाटील यांना वरील संशयीतांनी तालुक्यातील करवंदे गावाजवळ आणून हॉकी स्टीक, लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी मंगेशने आरडा ओरड केल्याने ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने धावून येऊ लागल्याने मंगेशला पुन्हा वाहनात टाकून सुरगाण्या जवळील उंबरपाडा गावाजवळ टाकून पसार झाले होते. संशयीत आरोंपी जवळील मोबाईलमधील मिळालेल्या फोटोंच्या पुराव्यांवरून या संशियतांना अटक करण्यात आली होती. मारहाण करण्यापुर्वी या सर्वांनी एकत्रित फोटो काढले होते.