नाशिकमध्ये नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात घेतला कंबरेच्या बेल्टने गळफास

By अझहर शेख | Published: January 10, 2024 05:40 PM2024-01-10T17:40:59+5:302024-01-10T17:41:50+5:30

पोलिसांनी तपासले दप्तर

A class IX student hanged himself with a waist belt in a residential house in nashik | नाशिकमध्ये नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात घेतला कंबरेच्या बेल्टने गळफास

नाशिकमध्ये नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात घेतला कंबरेच्या बेल्टने गळफास

नाशिक : अज्ञात कारणातून सातपुर परिसरातील प्रबुद्धनगरात नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. साहिल संदीप पगारे (१४,रा. महालक्ष्मी चौक, सातपुर) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने सातपुरच्या प्रबुद्धनगरात हळहळ व्यक्त होत आहे. साहिलने अशाप्रकारे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास आता सातपुर पोलिस करत आहेत.

गरीब कुटुंबातील साहिल हा नववीला शिक्षण घेत होता. वडील कामानिमित्त घराबाहेर गेलेले होते तर आई नेहमीप्रमाणे घराजवळ लहानशा टपरीवर किराणा वस्तूंची विक्री करत होती. याचवेळी मंगळवारी (दि.९) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास कंबरेच्या पट्ट्याने घरातील लोखंडी पाइपच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याने दरवाजा आतून कडी लावून बंद केलेला होता. काही वेळेनंतर ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी आरडाओरड करत तत्काळ साहिलला खाली उतरवून शासकिय जिल्हा रूग्णालयात दाखल केल; मात्र तेथे वैद्यकिय अधिकारी यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अश्विनी उबाळे, पाेलिस नाईक गणेश घारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आजूबाजूला व नातेवाईकांकडेही चाैकशी केली; मात्र साहिलच्या आत्महत्येमागील नेमके कारण पुढे अद्याप आलेले नाही. पाेलिसांनी त्याचे शाळेचे दप्तर व इतर शालेय साहित्य तपासले, त्यामध्येसुद्धा कुठल्याहीप्रकारचे आक्षेपार्ह लिखाण किंवा चिठ्ठी वगैरे सापडली नसल्याचे सातपूर पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास घारे हे करत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

Web Title: A class IX student hanged himself with a waist belt in a residential house in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.