शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचा ७ ला मोर्चा

By admin | Updated: September 26, 2016 23:43 IST

मालेगाव : मुस्लीम रिझर्व्हेशन फेडरेशनचा एल्गार

मालेगाव : आरक्षणासाठी मराठा समाजाच्या मोर्चांपाठोपाठ आता मुस्लीम समाजानेही मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मालेगावी मुस्लीम रिझर्व्हेशन फेडरेशनच्या बैठकीत येत्या ७ आॅक्टोबर रोजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.२०१४ मध्ये आघाडी सरकारने मराठा समाजास १६ टक्के व मुस्लीम समाजास पाच टक्के आरक्षण जाहीर केले होते. याच दरम्यान राज्यात सत्तांतर होऊन युतीचे शासन आले. न्यायालयाने दोन्ही समाजाचे आरक्षण रद्द केले; परंतु मुस्लीम समाजास शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचा सल्ला दिला होता. मात्र शासनाने त्यावर विचार केला नाही. परिणामी मुस्लीम समाजास नोकरी व शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी, राज्यातील एक लाख एकर जमीन वक्फ बोर्डाची असून, यापैकी सत्तर हजार एकर जमिनीवर अतिक्रमण आहे हे अतिक्रमण काढण्यात यावे, वक्फ बोर्डाच्या जमिनीद्वारे मिळणारे उत्पन्न मुस्लीम समाजाच्या विकासावर खर्च करण्यात यावे, सच्चर कमिटी, महेमूद-उल रहेमान व रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, दलित वस्ती सुधार कार्यक्रम राबवून मुस्लीम समाजास सुविधांसाठी शंभर टक्के निधी द्यावा या मागण्यांसाठी मालेगाव शहरातून मुस्लीम रिझर्व्हेशन फेडरेशनतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी अ‍ॅड. हिदायतुल्लाह अन्सारी, अ‍ॅड. नियाज अहमद लोधी, मौलाना अय्युब कासमी, गुफरान अन्सारी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस सय्यद लियाकत अली, मोहंमद अतीक शाबान, आमीन सरदार, मोहंमद हलीम सिद्दीकी, प्रा. मजीद सिद्दीकी यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. यावेळी शहरातील अनेक संस्था, संघटना, सोसायटींनी आंदोलनास लेखी स्वरूपात पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)मुस्लीम समाजाला एकत्र येण्याची गरज मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर येत आहे. काही घटकांनी ंमिुस्लिमांना आरक्षण मिळू नये म्हणून आपली भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे मुस्लीम समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे.मुस्लीम समाजाला एकत्र येण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.