शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणच्या सिंचन प्रकल्पांसाठी ७७ कोटी

By admin | Updated: January 2, 2017 00:40 IST

सुभाष भामरे : ऐंशी गावांचा पाणीप्रश्न सुटेल


सटाणा : तालुक्यासाठी संजीवनी ठरणाऱ्या सिंचन प्रकल्पांच्या कालव्यांचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारकडून ७७ कोटी रु पयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रसिध्द होऊन कामाला सुरु वात करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने राज्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नाबार्ड कडून सतरा हजार कोटी रु पये मंजूर झाले आहेत. त्यातून बागलाणसाठी ७७ कोटी रु पयांचा निधी देण्यात आला आहे. हरणबारी डावा, उजवा कालवा, तळवाडे भामेर एक्सप्रेस कालवा व केळझर चारी क्र मांक आठ या सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. उजव्या कालव्याचे काम मार्गी लावण्यासाठी केंद्रीय जल आयोगाकडे तांत्रिक बाबींची पूर्तता केली जाईल. त्यांनतर पारनेर, बिजोटे, कोटबेल, खिरमानी, नळकस, सारदे, वायगाव, सातमाणे पर्यंत नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मेरीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हरणबारी डाव्या कालव्यासाठी ५५ कोटी, तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्यासाठी १५ व केळझर चारी क्र मांक आठच्या कामासाठी ७ कोटी असा ७७ कोटी रु पयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या निधीमुळे प्रकल्प पूर्णत्वास येऊन ऐशी गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. चारी क्रमांक आठचे काम मुळाणे पर्यंत पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत भाक्षी ,चौगाव ,कऱ्हे व अजमिर सौंदाणे पर्यंत सहा किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुनदच्या सुळे डावा कालव्याचे ४७ किलोमीटर पर्यंत काम पूर्ण झाले असून हा कालवा आरम नदी पात्रापर्यंत पूर्ण करून ते पाणी आराई ,सटाणा, मोरेनगर, ठेंगोडा, दह्याने, पिंपळदर, मुंजवाड गावांसाठी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा कडे सादर करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.सह्याद्री अतिथी गृहावर रविवारी डॉ.भामरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. मोरे, उप अभियंता दिलीप काळे, डॉ. शेषराव पाटील, कृती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, अण्णा अहीरे, रवींद्र खैरनार, जिभाऊ कोर, क्र ांती येवला उपस्थित होते. (वार्ताहर)