सायंकाळी सातवाजेची वेळ मर्यादा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:46 PM2020-10-08T23:46:16+5:302020-10-09T01:18:36+5:30

नाशिक: साथरोग आणि व्यवसाय या दोन्हीचा समतोल साधून सर्वच व्यवसायांच्या वेळा या एकसमान ठेवण्यात आल्या असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी सात वाजेची वेळ मर्यादा कायम राहाणार असल्याचे स्षष्ट केले आहे. त्यामुळे जिल्'ातील हॉटेल्स,रेस्टॉरंट हे सायंकाळी सात वाजेनंतर बंदच राहणंर आहेत.

The 7 pm time limit remains the same | सायंकाळी सातवाजेची वेळ मर्यादा कायम

सायंकाळी सातवाजेची वेळ मर्यादा कायम

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी: हॉटेल सात नंतर राहाणार बंदच

नाशिक: साथरोग आणि व्यवसाय या दोन्हीचा समतोल साधून सर्वच व्यवसायांच्या वेळा या एकसमान ठेवण्यात आल्या असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी सात वाजेची वेळ मर्यादा कायम राहाणार असल्याचे स्षष्ट केले आहे. त्यामुळे जिल्'ातील हॉटेल्स,रेस्टॉरंट हे सायंकाळी सात वाजेनंतर बंदच राहणंर आहेत.

जिल्हयात सुरू असलेल्या आणि नुकतेच सुरू झालेल्या व्यवसायांच्या वेळ मर्यादेबाबत अनेक चर्चा होत आहेत. अनेक व्यवसायिकांनी सायंकाळी सातची वेळ मर्यादा ही गैरसोयीची असल्याचे सांगून रात्री दहा वाजेची वेळ करण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य जिल्हे आणि नाशिक जिल्'ातील परिस्थितीकडे लक्ष वेधून नाशिक जिल्'ात सर्वच व्यवसायांची वेळ एकसमान राहाणार असल्याचे सांगितले आहे.
इतर जिल्'ातील कोरोनाची परिस्थिती आणि तेथील स्थानिक प्रशासनाने घेतेले निर्णय आपल्याकडे लागू करण्याचे अनुकरण करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यंतरी काही शहरांनी अचानक पुर्ण लॉकडाऊन केला असतांना आपल्याकडेही लॉकडाऊन करण्याची मागणी होत होती. पण आपण अनलॉक वर ठाम होतो. वास्तविक इतरांचे अनुकरण करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले

सर्व बाबींचा विचार करून सर्वांच्या हिताचा योग्य तो निर्णय घेणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी असते. शासन आणि प्रशासनाला साथरोग आणि अर्थचक्राला चालना देणे असा दोन्हींचा समतोल साधायचा असतो. कोरोना नियंत्रणासाठी एकसुत्रता राहाण्याच्या दृष्टीने तसेच अंमलबजावणी करणे शक्य व्हावे यासाठी जिल्'ात सर्व व्यवसायांच्या वेळा एकसमान ठेवण्यात आल्या असून सायंकाळी सात वाजेच्या वेळ मर्यादेचे त्यांनी समर्थन केले आहे.


वेळोवेळी योग्य व संतुलित निर्णय घेतल्यामुळेच जिल्'ातील स्थिती आता नियंत्रणात आली आहे. कुठे काय आदेश काढले जात आहे यापेक्षा आपल्या जिल्'ातील परिस्थिती नियंत्रित करणे महत्वाचे आहे. आपल्याकडे सायंकाळी सात वाजेनंतर व्यवसाय बंदची कार्यवाही योग्य आहे

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.

 

Web Title: The 7 pm time limit remains the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.