शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत ६३ लाखांची घरफोडी

By admin | Updated: January 23, 2016 22:45 IST

भरवस्तीतील प्रकार : व्यापारी बाजारपेठेत भीतीचे वातावरण

घोटी : येथील डहाळे ज्वेलर्सच्या संचालकाच्या घरातून चोरट्यांनी सुमारे ५० लाखांची रोख रक्कम आणि दागिन्यांसह तब्बल ६३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.घोटी येथील सराफ कैलास तुकाराम डहाळे यांचे डहाळे ज्वेलर्स हे दागदागिन्यांचे दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून डहाळे कुटुंबीय तीर्थयात्रेला गेले होते. त्यामुळे त्यांच्या संत नरहरीनगर येथील राहत्या बंगल्याला कुलूप होते. डहाळे कुटुंबीय सायंकाळी गावाहून परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला. मागील खिडकी तोडून चोरटे घरात घुसल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ घोटी पोलिसांना कळवले. पोलिसांनी धाव घेत सर्व माहिती घेतली. डहाळे यांनी अन्य कोणाला देण्यासाठी आणलेली ५० लाखांची रोख रक्कम, घरातील दागिने, व्यावसायिक कामासाठी असलेले सोने, चांदी, हिरे आदि दागिने घरफोडीमध्ये लंपास झाले आहेत. सुमारे ६३ लाखांपर्यंतचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज असून आकडा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून, घोटीचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, नवनाथ पवार, प्रदीप कदम आदिंनी जलदगतीने तपास सुरू केला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या मोठ्या घरफोडीमुळे घोटी शहरात खळबळ माजली असून, व्यापारीवर्गात घबराट पसरली आहे. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांची मदत घेतली मात्र अपेक्षित यश आले नाही. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)