६० टक्के बलात्कार विवाहाच्या आमिषापोटी

By विजय मोरे | Published: December 17, 2018 12:07 AM2018-12-17T00:07:05+5:302018-12-17T00:29:22+5:30

विवाहाबाबत प्रत्येक तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाइलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तीबरोबर संवाद साधून त्याच्या आवडी-निवडी जाणून घेता येतात़ सोशल मीडिया वा ओळखीतील परिचितांकडून विश्वास निर्माण करून विवाहाचे आमिष दाखवित बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे हे विवाहाच्या आमिषाने झाल्याचे समोर आले आहे़

 60 percent of raped marriages | ६० टक्के बलात्कार विवाहाच्या आमिषापोटी

६० टक्के बलात्कार विवाहाच्या आमिषापोटी

Next
ठळक मुद्देधक्कादायक : सोशल मीडियाद्वारे ओळख; चालू वर्षी सर्वाधिक गुन्हे

नाशिक : विवाहाबाबत प्रत्येक तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाइलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तीबरोबर संवाद साधून त्याच्या आवडी-निवडी जाणून घेता येतात़ सोशल मीडिया वा ओळखीतील परिचितांकडून विश्वास निर्माण करून विवाहाचे आमिष दाखवित बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे हे विवाहाच्या आमिषाने झाल्याचे समोर आले आहे़
शहर पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाणी व सायबर पोलीस ठाण्यात जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत बलात्काराचे ४२ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ४० गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे़ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांपैकी सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे विवाहाचे आमिष दाखवून केल्याचे पोलिसांकडील आकडेवारीवरून समोर आले आहे़ विवाहाच्या आमिषास केवळ अविवाहित तरुणीच नव्हे, तर विवाहित महिला व अल्पवयीन शाळकरी मुलीही बळी पडल्या असून, त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत़
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गत तीन वर्षांत १०८ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत़ या गुन्ह्यांतील कारणांचा आढावा घेतला असता नातेसंबंध, ओळखीतील तरुण तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम व विवाह जमविणारी संकेतस्थळे यावरून ओळख वाढवून प्रथमत: विश्वास निर्माण केला जातो़ यानंतर विवाहाचे आमिषाने तरुणींना भावनिक करून त्या नावाखाली बलात्कार केला जातो़ यावर कळस म्हणजे प्रेमसंबंधातून झालेल्या शरीर-संबंधांचे गुपचूप व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकून खंडणी उकळल्याचे प्रकारही घडले आहेत़२

मुळात ‘विवाह’ हे व्यक्तींमधील नातेसंबंध (नाते) निर्माण करणारे सामाजिक बंधन अथवा कायदेशीर करार असतो़ मात्र, सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल जगात वावरणारी तरुणाई विशेषत: तरुणी याकडे दुर्लक्ष करतात़ काही महिन्यांपूर्वीच ओळख झालेल्या व्यक्तीने दिलेल्या विवाहाच्या आमिषास भुलून आपले सर्वस्व बहाल करतात़ यानंतर काही दिवसांनी संबंधित अनोळखी तरुणाचा पूर्वीच विवाह झाल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे समोर येते़ पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांमध्ये गतिमंद, अल्पवयीन व शाळकरी मुलींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटनांची संख्याही तुलनेने अधिक आहे़

Web Title:  60 percent of raped marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.