५४ वर्षीय महिलेला जिवंत पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 01:23 AM2021-08-11T01:23:45+5:302021-08-11T01:25:06+5:30

शाब्दिक बोलाचालीतून झालेल्या वादातून संशयित रिक्षाचालकाने पीडित महिलेच्या बहिणीच्या घरात जाऊन अंगावर रॉकेल ओतून महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. १०) दुपारी पेठरोडवरील कुमावतनगर-शिंदेनगर भागात घडला. या घटनेत महिला ८० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.

54-year-old woman set on fire | ५४ वर्षीय महिलेला जिवंत पेटविले

५४ वर्षीय महिलेला जिवंत पेटविले

googlenewsNext
ठळक मुद्दे८० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर; पेटविणारा संशयित रिक्षाचालकही भाजला

पंचवटी : शाब्दिक बोलाचालीतून झालेल्या वादातून संशयित रिक्षाचालकाने पीडित महिलेच्या बहिणीच्या घरात जाऊन अंगावर रॉकेल ओतून महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. १०) दुपारी पेठरोडवरील कुमावतनगर-शिंदेनगर भागात घडला. या घटनेत महिला ८० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. महिलेला पेटविणारा रिक्षाचालक तसेच बहिणीच्या मदतीला धावलेली वृद्ध बहीणदेखील यावेळी २० टक्क्यांपर्यंत भाजल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुमावतनगरला लागून असलेल्या शिंदेनगर येथे भाविक बेलाजी इमारतीत भारती आनंदा गौड (५४) व सुशीला ओमप्रकाश गौड (६१) या दोघी सख्ख्या बहिणी वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी साडीविक्री व्यवसाय करणाऱ्या भारतीची तेथील एक रिक्षाचालक संशयित आरोपी सुखदेव गुलाब माचेवाल ऊर्फ कुमावत (५२) याच्यासाेबत ओळख झाली होती. त्यातून दोघांची जवळीक निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी दोघांत वाद झाला. त्यानंतर वाद मिटविण्यासाठी कुमावत भारतीच्या बहिणीच्या घरी आला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये पुन्हा शाब्दिक वादविवाद होऊन जोरदार भांडण झाले. यावेळी संतापलेल्या कुमावतने आपल्यासोबत आणलेल्या बाटलीतून रॉकेल भारतीवर ओतून पेटती काडी तिच्या दिशेने फेकून पेटविले तेव्हा बहीण जळत असल्याचे बघून सुशीला वाचविण्यासाठी पुढे धावली असता ती १५ टक्के तर कुमावत २० टक्के भाजला असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. या घटनेत भारती गंभीर भाजली गेल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. घडलेला प्रकार हा अनैतिक संबंधातून झाला आहे का, याबाबत पंचवटी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: 54-year-old woman set on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.