नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात 5 जण जखमी; संपूर्ण घर उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 11:06 IST2021-01-04T11:06:30+5:302021-01-04T11:06:38+5:30

जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

5 injured in gas leak blast in Nashik; The whole house collapsed | नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात 5 जण जखमी; संपूर्ण घर उद्धवस्त

नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात 5 जण जखमी; संपूर्ण घर उद्धवस्त

नाशिक : सिडको परिसरातील खुटवडनगर येथील धनदाई कॉलनीमध्ये असलेल्या एका बंगल्यात सोमवारी (दि.4) सकाळी सात वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घरातील पाच जण जखमी झाले असून यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करत लागलेली आग विझविली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, खुटवडनगर येथील पगार कुटुंबातील  पुष्पा पगार या सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या नातवाला पेज तयार करुन देण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला असता घरात अगोदरच गॅसची गळती झालेली असल्याने मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की घरातील दरवाजे खिडक्या आणि भिंतीदेखील  तुटल्या. खिडक्यांची तावदाने तर अंगणात येऊन पडली होती.. तसेच घराबाहेर असलेल्या वाहनांच्याही काचा फूटल्या. या स्फोटात  पुष्पा बळीराम पगार त्यांचे पती बळीराम पगार तसेच मुलगा अतुल पगार, मुलगी अश्विनी पगार तसेच नातू रोहन व रुची हे सर्व जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: 5 injured in gas leak blast in Nashik; The whole house collapsed