शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

२० महिन्यात ४३ पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर हल्ले

By admin | Updated: September 10, 2016 01:39 IST

पोलीस आयुक्तालय : राजकीय पदाधिकारी, गुंडांचा सहभाग

नाशिक : स्वत:च्या जिवाची पर्वा न करता जनतेच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस कर्तव्यावर असलेल्या पोलीस आयुक्तालयातील ४३ कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत़ पोलिसांवर हल्ले केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये राजकीय पदाधिकारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांची संख्या अधिक आहे़ केवळ पोलीस आयुक्तालयच नव्हे तर राज्यभरात वाढत चाललेल्या या घटनांमुळे पोलिसांच्याच सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ मुंबईतील पोलीस कर्मचारी विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर तर या प्रश्नावर मोठी चर्चा सुरू आहे़ नाशिक जिल्हा न्यायालय आवारात तसेच जिल्हा रुग्णालयात मोक्कातील आरोपींनी केलेला पोलीस निरीक्षकांवर हल्ला, वाहतूक पोलीसास शिवीगाळ, अंगावर वाहन चालवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न याबरोबरच वाद मिटविण्यासाठी गेलेले भद्रकाली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल विजय मोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २०१५ मध्ये भारतीय दंड विधान कलम ३५३ अन्वये (सरकारी कामात अडथळा) ६० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे़ त्यामध्ये सरकारी कामात हस्तक्षेप, अरेरावी, धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारचा गुन्ह्णांचा समावेश आहे़ या गुन्ह्णांपैकी २८ हल्ले हे पोलिसांवरील हल्ल्यांचे आहेत़ तर या वर्षात ८ सप्टेंबरपर्यंत ३५३ अन्वये ३३ गुन्हे दाखल असून, त्यापैकी १५ गुन्हे हे पोलिसांवरील हल्ल्याचे आहेत़पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये सहभाग असलेल्या संशयितांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे गुन्हेगार, राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित कार्यकर्त्यांचे असून यानंतर सर्वसामान्य नागरिक आहेत़ पोलीस आयुक्तालयात शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण अधिक आहे़, तर या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात त्वरित जामीन मिळत असल्यामुळे अशांची भीड चेपली जाते आहे़ त्यामुळे या कायद्यातच बदल करण्याची मागणी सेवानिवृत्त पोलिसांच्या संघटना तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून केली जाते आहे़ (प्रतिनिधी)