शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

42 हजार टन द्राक्षांची निर्यात

By admin | Updated: March 3, 2017 00:21 IST

निफाड : भारतातून या वर्षी आतापर्यंत ४२ हजार १०४ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

निफाड : भारतातून या वर्षी आतापर्यंत ४२ हजार १०४ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. सध्या द्राक्ष हंगाम बहरात असून, निर्यातक्षम द्राक्षांची मागणी युरोप, रशिया आदि देशांत असल्याने यावर्षी २३.७१ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असली तरी निर्यातक्षम द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नसल्याने निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.यंदाच्या द्राक्ष हंगामात विशेषत: महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या द्राक्षाला सुरुवातीला १०० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. आता मात्र चिली हा देशही सध्या द्राक्षनिर्यात करीत असल्याने पांढरे द्राक्ष ५० ते ६० रु पये व काळी द्राक्ष ६० ते ७० रुपये सरासरी भावाने निर्यात होत आहे. सुरुवातीला काही निर्यातदारांनी साखर कमी असूनही माल पाठवला. परिणामी तेथील मार्केटमध्ये अपप्रचार होऊन आणि शिवाय चिलीचा माल स्पर्धेत असल्याने अवघ्या ३० दिवसात भाव निम्म्याने खाली आले. युरोपमध्ये तरी भाव सरासरी टिकून आहे. रशियात ते ४० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. असे असले तरी मार्चअखेरपर्यंत चिलीचा माल संपेल आणि तपमान असेच वाढत गेले तर द्राक्षांना मागणी वाढून भारतीय द्राक्षाला दरही चांगला मिळेल. मात्र कोणतेही नैसर्गिक संकट या काळात यायला नको, असा आशावाद अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन खापरे यांनी व्यक्त केला. फक्त द्राक्ष उत्पादकांनी घाई न करता संयमाने घ्यावे ८ ते १० दिवसात मार्केटमध्ये पुन्हा तेजी येऊ शकेल.मागील वर्षी युरोपमध्ये ८४ हजार मे. टन निर्यात झाली होती. आताच्या घडीला ती ४२ हजार १०४ मे.टन इतकी असून, यंदाच्या हंगामात ती ९० हजार मे.टनाच्याही पुढे जाईल असा अंदाज खापरे यांनी व्यक्त केला. साधारणत: युरोप बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक निर्यात रशियामध्ये झाली आहे मात्र त्याची आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)