देवारपाडे शिवारात कार- डंपर अपघातात ४ ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:55 IST2021-05-03T01:54:00+5:302021-05-03T01:55:28+5:30

मालेगाव तालुक्यातील देवारपाडे शिवारात मुंबई- आग्रा महामार्गावर साईकार ढाब्यासमोर रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास डंपर आणि अल्टो कार याच्यात झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले.

4 killed, 1 injured in car-dumper accident in Dewarpade Shivara | देवारपाडे शिवारात कार- डंपर अपघातात ४ ठार, एक जखमी

देवारपाडे शिवारात कार- डंपर अपघातात ४ ठार, एक जखमी

मालेगाव : तालुक्यातील देवारपाडे शिवारात मुंबई- आग्रा महामार्गावर साईकार ढाब्यासमोर रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास डंपर आणि अल्टो कार याच्यात झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. अपघातात एक जण जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 
सामान्य रुग्णालयातील पोलीस कर्मचारी दीपक कोळी यांनी तालुका पोलिसांत खबर दिली.  अल्टो कार क्र. यूपी-६४ एए-९२१२  ही धुळ्याकडे जात असताना धुळेकडून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने कारला धडक दिली. 
अधिकारी घटनास्थळी
अपघातात सुनीलकुमार पारसनाथ यादव (२७), रा. २४ सारसारा, ता. बदलापूर, जि. ठाणे, रवीश धर्मराज यादव (२३), रा. महाराजागंज, जि.  जौनपूर, विजेंद्र कुमार रमाकांत यादव (२९), रा. परसोई  सोनभद्र, उत्तर प्रदेश, ह. मु. ज्ञानेश्वर निवास, शिवाजीनगर, वागळे इस्टेट, ठाणे  व अनिल तिवारी हे ठार झाले. धर्मेंद्र सुरेशनाथ मिश्रा हा जखमी झाला. घटनास्थळी अपर पोलीस निरीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक शशिकांत शिंदे, उपनिरीक्षक देवीदास ढुमाणे, पोलीस उपनिरीक्षक  विशाल पाटील,  मोहित मोरे, यांनी  भेट देऊन पाहणी केली.

Web Title: 4 killed, 1 injured in car-dumper accident in Dewarpade Shivara