³ffVfIYf ° f ;fûSXe¨fZ ÀfÂf ÀfbøY¨f; ¦fZ¦f½f¦fZ¼ëf §fMX³ffa¸f²¹fZ ¨fûSXMëfa³fe »ffa¶fdU» °ff ° fe³f Qb¨ffIYe | नाशकात चोरट्यांनी लांबविल्या तीन दुचाकी
नाशकात चोरट्यांनी लांबविल्या तीन दुचाकी

ठळक मुद्देनाशिकमध्ये चोरीचे सत्र सुरूचइंदिरानगर, पंचवटी, उपनगर भागातून दुचाकी चोरी

नाशिक: शहरासह उपनगरांमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून इंदिरानगर, पंचवटी आणि म्हसरूळ भागात पुन्हा  वेगवेगळ््या घटनांमध्ये तीन दुचाकींची चोरी झाल्याचे गुन्हे समोर आले आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी  इंदिरानगर, पंचवटी आणि म्हसरूळ सारख्या शहारतील वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन दुचाकींची चोरी केली आहेत. यात पाथर्डी फाटा, खंडेरावनगर परिसरातील सागर सुनील केंद्रे (२७) पाथर्डी यांची दुचाकी  क्रमांक एमएच १५, डीपी ००२६  वासननगरमधील गोकुळ हाइट्स येथून चोरीला गेली.  तर सातपूरच्या श्रमीकनगर भागातील प्रवीण मनोहर चरडे (३३) यांची दुचाकीही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. तिसरी घटना दिंडोरी रोडच्या  म्हसरूळ परिसरात घडली असून फिर्यादीने इमारतीच्या वाहनतळावर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून  वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.  

Web Title: ³ffVfIYf ° f ;fûSXe¨fZ ÀfÂf ÀfbøY¨f; ¦fZ¦f½f¦fZ¼ëf §fMX³ffa¸f²¹fZ ¨fûSXMëfa³fe »ffa¶fdU» °ff ° fe³f Qb¨ffIYe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.