शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ३८३ रुग्णालये अनधिकृत

By admin | Updated: March 11, 2017 01:58 IST

नाशिक : शहरातील ३८३ रुग्णालयांनी नूतनीकरण केले नसून अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे.

नाशिक : नर्सिंगहोम आणि मुंबई शुश्रुषागृहे अधिनियम १९४९ अंतर्गत शहरातील ३८३ रुग्णालयांनी नूतनीकरण केले नसून अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयांवर महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे.महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णालये व प्रसूतीगृहे यांना नर्सिंगहोम अंतर्गत नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणीकृत व्यावसायिकांनी ३१ मार्च २०१५ पासून तीन वर्षांकरिता नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे गरजेचे होते. परंतु, शहरातील ३८३ रुग्णालयांनी नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरणच केले नसल्याचे समोर आले आहे. शहरातील ५६६ रुग्णालयांपैकी केवळ १८३ रुग्णालयांच्याच नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण झालेले आहे. शहरात १८२ मॅटर्निटीहोम असून, ३८४ नर्सिंगहोम व हॉस्पिटल आहेत. त्यात १०५ मॅटर्निटी होम आणि ७८ नर्सिंगहोमच्या नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण झालेले आहे. तब्बल ७७ मॅटर्निटी होम आणि ३०६ नर्सिंगहोम व हॉस्पिटलचे अद्याप नूतनीकरण झालेले नाही. त्यात नूतनीकरणासाठी ४१ मॅटर्निटी होम, तर १८९ नर्सिंगहोमचे प्रस्ताव मनपाकडे आलेले आहेत, तर अद्याप ३६ मॅटर्निटी होम व ११७ नर्सिंगहोमचे नूतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल झालेले नाहीत. सदर नर्सिंगहोम व मॅटर्निटी होम यांनी तत्काळ नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करून घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने दिला आहे.