कर्मचाऱ्यांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:19 IST2018-11-17T22:54:14+5:302018-11-18T00:19:30+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीत काम करणाºया कर्मचाºयांच्या वेतनवाढ कराराची मुदत मार्च २०१८ अखेर संपल्याने १ एप्रिलपासून कर्मचाºयांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे चारही विद्युत कंपन्यांना सादर करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते व सल्लागार व्ही. डी. धनवटे यांनी दिली. या वेतनवाढीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील तब्बल ८६ हजार कामगार, अधिकारी व अभियंत्यांना फायदा होणार आहे.

कर्मचाऱ्यांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव
एकलहरे : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीत काम करणाºया कर्मचाºयांच्या वेतनवाढ कराराची मुदत मार्च २०१८ अखेर संपल्याने १ एप्रिलपासून कर्मचाºयांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे चारही विद्युत कंपन्यांना सादर करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते व सल्लागार व्ही. डी. धनवटे यांनी दिली. या वेतनवाढीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील तब्बल ८६ हजार कामगार, अधिकारी व अभियंत्यांना फायदा होणार आहे.
जुना करार रद्द झाल्याने नवीन करारासाठी वेतनवाढ समिती गठित करून वाटाघाटी सुरू करण्यासाठी वर्कर्स फेडरेशनने चारही कंपन्यांच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना संघटनेच्या वतीने मार्च महिन्यात लेखी पत्र दिले होते. त्या पार्श्वभूमीवर वेतनवाढ समिती गठित करण्यात आली. या समितीच्या बैठकीत नवीन पगारवाढ प्रस्ताव तयार करण्यात आला. केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्ता, तंत्रज्ञ ३ पदांना बढतीद्वारे पदोन्नती आदी मागण्या प्रस्तावात करण्यात आल्या आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे अध्यक्ष जयकुमार श्रीनिवासन यांना नवीन पगार वाढीचे प्रस्ताव देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा, सरचिटणिस कृष्णा भोयर, अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव, उपसरचिटणीस अरुण म्हस्के, एस. आर. खतीब, भीमाशंकर पोहकर आदी उपस्थित होते.